नवी दिल्ली - पश्चिम दिल्लीच्या हरिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तिहेरी हत्याकांडाने मोठी खळबळ माजली. या प्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. त्याचसोबत २ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी युवक आणि त्याची गर्लफ्रेंडसह अन्य आरोपी फरार आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. अशोक नगर भागात आज सकाळी पती-पत्नी आणि मोलकरणीची हत्या झाल्याचं उघड झाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, या तिघांचा चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. पती-पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी घरातच होते. तेव्हा त्याठिकाणी मोलकरीण पोहचली तेव्हा आरोपींनी तिचीही हत्या केली. नोकरीवरून काढल्यामुळे बदला घेण्याच्या दृष्टीने हे हत्याकांड घडवण्यात आले. मृत शालू ब्यूटी पार्लर चालवत होती. १० दिवसांपूर्वी तिने हत्येतील मुख्य आरोपी आणि त्याची गर्लफ्रेंडला नोकरीवरून काढलं होते. या दोघांसोबत शालूचा वाद झाला होता. त्यामुळे बदला घेण्यासाठी दोघांनी मित्रांसोबत मिळून तिचा काटा काढण्याचं ठरवलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सचिन, सुजितला अटक केली आहे. तर मुख्य आरोपीसह अन्य फरार आहेत. त्यांनाही लवकर पकडण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं.
लॅपटॉप, कॅश घेऊन फरार४ मजली इमारतील खालच्या मजल्यावर पार्किंग एरियात शालू आणि मोलकरणीचा मृतदेह सापडला तर पहिल्या मजल्यावर समीर अहूजा यांची बॉडी पोलिसांना आढळली. या ४-५ आरोपींचा समावेश होता. ज्यातील दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींच्या घरातून चोरी केलेले सामान जप्त केले आहे. त्याचसोबत हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि रक्ताने माखलेला टॉवेलही सापडला आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी लॅपटॉप, कॅश आणि अन्य सामानाची चोरी केल्याचं पोलीस तपासात पुढे आले. CCTV चा डीवीआर घेऊन पळालेपोलिसांनी सांगितले की, आरोपींनी घरात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून डीवीआर पळवून घेऊन गेले. एका सीसीटीव्ही आरोपी दिसून येत आहे. आरोपी सकाळी ८ च्या सुमारास २ बाईकवरून आले होते. ९ च्या सुमारास हे हत्याकांड करून आरोपी गडबडीने तिथून निघून जाताना दिसले.