महानगर एक्प्रेसमध्ये दोन इसम प्रवाशांचे तिकीट चेक करत होते. एक झाला पोलीस आणि दुसरा टीसी बनला. संशय आल्याने प्रवाशाने फिरवला 139 रेल्वे हेल्पलाईन नंबर अखेर "अशी" सूत्र फिरली आणि पोलिसांच्या जाळ्यात एक आरोपी सापडले तर दुसरा पसार झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक भगवान त्रिबंके (27, रा. अंबरनाथ) व त्याचा साथीदार धीरज यादव (30, रा. अंबरनाथ) अशी या भामट्यांची नाव आहेत.
आजकाल झटपट पैसे मिळवण्यासाठी कोणकधी कुठला मार्गाचा वापर करेल याचा काही नेम नाही. लवकर पैसे मिळवण्यासाठी चक्क एक होमगार्ड पोलीस झाला तर त्याचा मित्र टीसी झाला. मग काय यांचा प्लॅन ठरला. एक्प्रेसमध्ये जाऊन पोलीस आणि टीसी असल्याचं भासवत लोकांची फसवणूक करायला त्यांनी सुरवात केली. मात्र महानगर एक्प्रेमध्ये या दोघांचा भांडाभोड झाला अन् यापैकी एकाची एक्प्रेसमधून थेट त्यांची जेलमध्ये रवानगी झाली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक भगवान त्रिबंके (27, रा. अंबरनाथ) व त्याचा साथीदार धीरज यादव (30, रा. अंबरनाथ) अशी या भामट्यांची नाव आहेत. विनायक हा होमगार्ड असून त्याला पोलिसांनी अटक केलीय तर धीरज हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. महानगर एक्प्रेस कल्याण स्थानकातून सुटताच जनरल डब्यात दोन जणांनी तिकीट चेक करायला सुरुवात केली. यावेळी दीपक कुमार बिन्द राजकुमार हे देखील प्रवास करत होते. आम्ही पोलीस आणि टीसी आहोत असं सांगत या दोघांनी त्यांच्याकडून 700 रुपये हिसकावून घेतले. इतर प्रवासी हा सर्व प्रकार पाहत होते. प्रवाशांपैकी एका प्रवाशाला या दोघांवर संशय आला. प्रवाशाने रेल्वेच्या 139 या हेल्पलाईनवर नंबरवर फोन केला आणि सर्व हकीकत सांगितली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी नाशिक रेल्वे स्थानकात थांबलेल्या एक्स्प्रेसच्या डब्यातून दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र धीरज हा पळून जाण्यात यशस्वी ठरला. या दोघांवर कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दोघांनी अजून किती ठिकाणी लोकांनां टोप्या घातल्या याची देखील चौकशी पोलीस करत आहेत.