शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

प्रेयसीचा दुचाकीवर बसण्यास नकार, भररस्त्यात केले अश्लील चाळे

By दयानंद पाईकराव | Published: December 31, 2023 2:18 PM

दोघांचे सूत जुळले. त्यांच्यात भेटीगाठी वाढून ते फिरायलाही जाऊ लागले.

नागपूर : दुचाकीवर बसण्यास नकार देणाऱ्या प्रेयसीशी भर रस्त्यात अश्लील चाळे करून प्रियकराने तिचा विनयभंग केला. प्रेयरीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

संकेत मेश्राम (२५, मोहाडी. जि. भंडारा) असे आरोपीचे नाव आहे. एमआयडीसीमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेची फेसबुकवरून संकेत मेश्रामशी ओळख झाली होती. दोघांचे सूत जुळले. त्यांच्यात भेटीगाठी वाढून ते फिरायलाही जाऊ लागले. १४ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी संकेतने तिला भेटायला बोलावले. मात्र, तिने घराबाहेर पडण्यास नकार दिल्याने आरोपी संकेतने तिला घरी जाऊन मारहाण केली होती. तेव्हापासून तिने संकेतशी बोलणे बंद केले. दोघांची बोलचाल नसली तरी ते मोबाईलवरून एकमेकांच्या संपर्कात होते.

२७ डिसेंबर २०२३ रोजी तो महिलेच्या घराजवळ आला. त्याने प्रेयसीला बाहेर बोलावले आणि दुचाकीवर बसायला सांगितले. तिने गाडीवर बसण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेला आरोपी संकेतने तिला मारहाण करून तिच्याशी रस्त्यावरच अश्लील चाळे केले. संकेतच्या तापट स्वभावाला कंटाळलेल्या महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी संकेतविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग