कर्नाटकमध्ये एक २० वर्षीय तरूण टेस्ट राइडच्या नावावर शोरूममधून चक्क रॉयल एनफील्ड बाइक घेऊन गायब झाला. बराचवेळ होऊनही जेव्हा तरूण बाइक घेऊन परतला नाही तेव्हा शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी लगेच बाइक घेऊन फरार झालेल्या तरूणाचा शोध सुरू केला. पण सर्वांना आश्चर्याचा धक्का सर्वांना तेव्हा बसला जेव्हा बाइक रात्री उशीरा शोरूम समोर उभी दिसली.
तरूण सोमवारी दुपारी १.३० वाजता बंगळुरूच्या राजाजीनगरमधील एक शोरूममधून रॉयल एनफील्ड बाइक टेस्ट राइडसाठी गेला होता. पण काही तास होऊनही ना तरूण परतला ना शोरूमवाल्यांना बाइक परत मिळाली. तरूण टेस्ट राइडच्या नावाने बाइक घेऊन गायब झाला.
बाइक टेस्ट राइडआधी तरूणाकडून त्याच्या ड्रायव्हिंग लायसन्सची एक फोटोकॉपी आणि मोबाइल नंबर घेण्यात आला होता. जेव्हा बराचवेळ तरूण बाइक घेऊन परतला नाही तेव्हा शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.'टाइम्स ऑफ इंडिया'सोबत बोलताना शोरूमचा एक कर्मचारी म्हणाला की, 'तरूण बराचवेळ परतला नाही तर स्टाफची चिंता वाढली होती. सामान्यपणे टेस्ट राइड जास्तीत जास्त एक किंवा दोन तासांचीच असते. आम्ही त्याची ६.४५ पर्यंत वाट बघितली. आम्ही त्याच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण फोन स्विच ऑफ होता. नंतर पोलिसात तक्रार देण्यात आली'.
शोरूमबाहेर सोडून गेला ३.५ लाखांची बाइक
पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत बाइकची किंमत ३.५ लाख रूपये देण्यात आली आहे. पोलिसांनी तरूणावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जेव्हा तरूणाचा शोध सुरू केला तेव्हा रात्री ९ वाजताच्या सुमारास बाइक शोरूमसमोर उभी दिसली पोलिसांच्या हाती काही लागण्याआधी तरूण बाइक ठेवून गायब झाला होता. पोलीस म्हणाले की, आम्ही तरूणाला बोलवू आणि बाइक उशीरा परत करण्याचं कारण विचारू.