शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

भाजप आमदाराच्या घरावर धाड, ६ कोटी रुपये जप्त; मुलालाही केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 12:26 PM

आमदार विरुपक्ष्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलाने  ४० लाख रुपयांची लाच घेतल्यामुळे त्यास अटक करण्यात आली होती

कर्नाटकमध्ये आज सकाळी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. येथील बंगळुरू जल आपूर्ती आणि सीवरेज बोर्ड (बीडब्ल्यूएसएसबी) चे मुख्य लेखापाल प्रशांत मदल यांना कर्नाटक लोकायुक्तच्या अधिकाऱ्यांनी ४० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. प्रशांत हे चन्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराचे सुपुत्र आहेत. या कारवाईनंतर आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या निवासस्थानी धाड टाकण्यात आली असून घरातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. 

आमदार विरुपक्ष्पा यांच्या अधिकारी असलेल्या मुलाने  ४० लाख रुपयांची लाच घेतल्यामुळे त्यास अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आता आमदार महोदयांच्या घरावरही लोकायुक्तांनी धाड टाकली असून ६ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. तर, मुलाच्या कार्यालयातून २ कोटी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. 

कर्नाटक साबण आणि डिटेर्जेंटला लिमिटेड (केएसडीएल) बोर्डासाठी कच्चा माल पुरवठा करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेवरुन याबाबत तक्रार करण्यात आली होती. प्रशांतचे वडिल आमदार मदल विरुपक्षप्पा हे केएसडीएलचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे, याप्रकरणी संबंधित अधिकारी भाजप आमदार विरुपक्षप्पा यांचीही चौकशी करण्यात आली असून त्यांच्या घरातून ६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यानंतर, आमदार महोदयांनी केएसडीएलच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे.  

४० लाख रुपयांची लाच घेताना मुलाला अटक

कर्नाटकमध्ये सध्या भाजपचं सरकार असून विरोधकांकडून सातत्याने भाजप नेत्यांवर लाचखोरी आणि टेंडरमध्ये टक्केवारी, पैशांची अफरातफरीचा आरोप केला जात आहे. प्रशांत यांनी एका टेंडर प्रक्रियेला क्लिअर करण्यासाठी ८० लाख रुपयांची लाच मागितली होती. त्याचपैकी, ४० लाख रुपयांची रक्कम स्विकार करताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी प्रशांत यांना रंगेहात अटक केली. लोकायुक्तांकडून आता या घटनेची व कागदपत्रांची सखोल चौकशी होत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBengaluruबेंगळूर