पतीचा विश्वासघात, बायकोनं चहातून दिलं विष; गंभीर असतानाही पत्नीसाठी 'तो' गहिवरला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 07:52 PM2022-01-30T19:52:34+5:302022-01-30T19:53:18+5:30
Crime News :पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे पतीला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट आखला.
भोपाळ - छतरपूरमधील एका पत्नीने आपल्या पतीचा विश्वासघात करत त्याच्या चहात विष घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. यामुळे पतीला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी तिने पतीच्या हत्येचा कट आखला.
छतरपूर जिल्ह्यातील लवकुशनगर पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. येथे राहणारा पीडित प्रमोद विश्वकर्माने सांगितलं की, त्याची पत्नी सुधा विश्वकर्मा हिचे संतोष विश्वकर्मा याच्यासोबत प्रेमसंबंध आहेत आणि दोघांना मी खूपदा आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं आहे. पत्नीला त्याने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकत नसल्याचं त्याचं म्हणणं आहे.
पीडित व्यक्तीने पत्नीचे कृत्य आपल्या कुटुंबीयांनाही सांगितले. ते ही तिला वारंवार समजावत होते. मात्र, पीडित तरुणासोबत राहायचं नसल्याचे सांगून पत्नीचे विवाहबाह्य संबंध सुरूच होते. पीडित तरुणाला आपल्या पत्नीला सोडण्याची इच्छा असून त्यांच्या लग्नाला ८ ते ९ वर्षे झाले आहेत. याशिवाय त्यांना दोन मुलंही आहेत. त्यामुळे पती कायम पत्नीला समजावण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, पत्नी आपल्या मार्गातील अडसर ठरलेल्या पतीला बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पत्नीने चहामध्ये विष दिल्याचा दावा पतीने केला आहे. तरीही प्रमोद आपल्या सुंदर पत्नीला सोडू इच्छित नाही. रुग्णालयात असतानाही तो आपल्या पत्नीचा फोटो पाहून गहिवरून जात आहे.