अकोला - आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम म्हणजेच फायनल भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असलेल्या राधकीसन प्लॉटमधील सट्टा अड्ड्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून एक आरोपीस अटक केली. अग्रवाल नामक इस्माकडून ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.न्यू. राधाकिसन प्लॉट येथे क्रिकेट सट्टा लावण्यात येत असल्याच्या माहितीवरून सिटी कोतवाली पोलिस स्टेशन चे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी महेश महावीरप्रसाद अग्रवाल (४७, न्यू राधाकिसन प्लॉट) याला ताब्यातघेतले. त्याच्याजवळून पोलिसांनी १० हजार रुपयांचा १ मोबाईल, २५ हजार रुपयांची एलसीडी टीवी, ६०० रुपयांचे २ सेटअप बाक्स, नगदी १ हजार असा एकूण ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कोतवाली पोलिस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात जगदीश जायभाय, प्रमोद डुकरे, ज्ञानेशवर रडके, नागसेन वानखडे, अमित दुबे यांनी केली. राधकीसन प्लॉटमधील याच फ्लॅटमध्ये अकोल्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्ती जुगार खेळत असताना सिटी कोतवाली पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. त्यानंतर आता याच ठिकाणावर सट्टा अड्डा सुरू करण्यात आला आहे. मात्र याची माहिती मिळताच ठाणेदार विलास पाटिल यांनी छापा टाकला.
क्रिकेटच्या सामन्यावर सट्टा; राधकीसन प्लॉटमधील सट्टा अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:22 AM