शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

England vs India: प्रत्येक 'बाॅल'वर सहा सेकंदात बेटिंग; गहुंजेतील भारत-इंग्लंड मॅचवेळी रॅकेट उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:29 AM

England vs India 2nd ODI Betting Racket: एमसीएच्या गहुंजे येथील (पुणे) स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दुसरा सामना सुरू होता. त्यावेळी बेटिंग सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ऑनलाइन बेटिंग घेणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश (Online Betting Racket) करण्यात आला आहे. सामन्याचे प्रक्षेपण होण्यासाठी सहा सेकंदांचा अवधी लागतो. त्याचा गैरफायदा घेत त्या सहा सेकंदांच्या अवधीसाठी प्रत्येक 'बाॅल'वर पैसे लावण्यास सांगून हे बेटिंग सुरू होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या कारवाईमध्ये महराष्ट्रासह परराज्यातील ३३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वाकड पोलिसांनी शुक्रवारी(दि. २६) रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली. (Online Betting Racket busted in Pune.)

एमसीएच्या गहुंजे येथील (पुणे) स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय दुसरा सामना सुरू होता. त्यावेळी बेटिंग सुरू होते. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्याचे आरोपी दुर्बिणीने निरीक्षण करीत होते. त्यामुळे प्रत्येक बॉलचा खेळ त्यांना थेट पाहता येत होता. त्या खेळाचे लाईव्ह टेलिकास्ट होण्यासाठी सहा सेकंदांचा अवधी लागतो. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी एका ॲप्सच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा घेत होते. याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार तीन पथके तयार करून मामुर्डी गाव, घोरवडेश्वर डोंगर आणि विमाननगर परिसरात छापा मारून ३३ जणांना अटक केली.  आरोपींकडून ७४ मोबाईल, ३ लॅपटॉप, एक लाख २६ हजार ४३० हजारांची रोकड, २८ हजार रुपये किंमतीची विदेशी चलनातील नाणी, कॅमेरे, दुर्बीण, स्पीकर आणि चारचाकी वाहन, असा ४४ लाख ८७ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मध्यप्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, उत्तरप्रदेश येथील आरोपींचा समावेश आहे.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा वापर

आरोपींनी स्टेडियमलगतच्या घोरावडेश्वर डोंगर तसेच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा वापर केला. तेथून दुर्बिणीने सामन्याचे निरीक्षण करून बेटिंग घेत होते. यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :India VS Englandभारत विरुद्ध इंग्लंडCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीPuneपुणे