शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सावधान... बाल सुधारगृहाला ड्रग्जचा डंख

By मनीषा म्हात्रे | Published: June 19, 2023 11:04 AM

या मुलांकडे गांजासह ब्लेड, मोबाइलही मिळून आला होता. त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीकडून एका फोनवर हे उपलब्ध झाले होते.

ड्रग्जच्या विळख्यात अडकत असलेल्या मायानगरी मुंबईला ‘ड्रग्ज फ्री’ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशावरून ‘मिशन थर्टी डेज’ ही धडक मोहीम मुंबई पोलिसांनी हाती घेतली. ही मोहीम सुरू असतानाच डोंगरीतील बालसुधारगृहात सुरक्षाकवच भेदून भिंतीपलीकडून ड्रग्ज पोहोचत असून, गुन्हेगारांची एक पुढची पिढी तयार होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात १० हजार स्क्वेअर यार्ड एवढ्या मोठ्या विस्तीर्ण परिसरामध्ये हे डोंगरी बालसुधारगृह वसलेले आहे. सध्या बालगुन्हेगारांसोबतच हरवलेली, बालमजुरीत अडकलेली, तसेच भिक्षेकरी मुलांना बालसुधारगृहात ठेवण्यात येते. नुकतेच एका कारवाईत बालसुधारगृहाच्या भिंतीवरून मुलांना बिनधास्तपणे ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आले. या मुलांकडे गांजासह ब्लेड, मोबाइलही मिळून आला होता. त्यांच्या नातेवाईक, मित्रमंडळीकडून एका फोनवर हे उपलब्ध झाले होते. डोंगरी पोलिसांनी दोन मुलांना ताब्यात घेत कारवाई केली. या कारवाईपूर्वीदेखील अंमलदाराने भिंतीपलीकडून आलेले ड्रग्ज जप्त केले होते.

३३.३२कोटी रुपयांचे ड्रग्ज चार महिन्यांत जप्त मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी तब्बल ४ हजार ९३५ कोटी २९ लाख ६१ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. यावर्षी एप्रिलअखेरपर्यंत ४ हजार ४८१ गुन्हे नोंद असून, ४,५२३ जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ३३ कोटी ३२ लाख ९८ हजारांचे ड्रग्ज जप्त केले आहे.

२०० ते ३०० रुपयांत मुलांचा ड्रग्ज तस्करीसाठी वापरधारावी, कुर्ला, वडाळा, अँटॉप हिलसारख्या परिसरात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करीसाठी लहान मुलांचा वापर केल्याचे एनसीबीच्या कारवाईतून समोर आले होते. कुर्ल्यातून अटक करण्यात आलेला बबलू पॅट्री लहान मुलांकडून ड्रग्ज तस्करी करून घेत होता. या मुलांना आधी ड्रग्जचे व्यसन लावायचे, पुढे ही नशा पूर्ण करण्यासाठी त्यांना २०० ते ३०० रुपये देऊन त्यांच्याकडून तस्करीचे काम करून घेतले जात होते. एक मुलगा गेल्या चार वर्षांपासून काम करत असल्याचेही समोर आले होते. आजही काही तस्कर या मुलांचा वापर करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

पोलिसांचा समुपदेशनावर भर...कारवाईनंतर अटक केलेल्या तरुण, तरुणींसह त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करण्यात येत आहे. तरुणाईनेदेखील ड्रग्जला नाही म्हणत आयुष्याला हो म्हणा. ड्रग्ज सेवनाबरोबर त्याच्या तस्करीत वेळ घालवण्यापेक्षा देशासाठी काही तरी करा. आयुष्य उद्ध्वस्त करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

पालकांनी काय करावे?तरुणाईने ड्रग्जच्या आहारी जाऊ नये,  तसेच पालकांनी पाल्य काय करतो यावर लक्ष ठेवायला हवे. आपला मुलगा एकटा राहतोय का? इंटरनेटवर त्याचा वावर वाढलाय का? त्याचे मित्रमंडळी बदलले आहेत का? याची माहिती घेत काही चुकीचे आढळून आल्यास पाेलिसांची मदत घ्यावी.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी