शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेला भदाणे अद्याप फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 6:39 PM

Rape Allegations Accused still wanted : १४ दिवस उलटल्यानंतरही उल्हासनगर पोलिसांना फरार भदाणे सापडेना

सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिकेत नोकरी मिळविण्यासाठी जन्मतारखेत फेरफार केल्या प्रकरणी तसेच पीएचडी पदवी अवैध असल्या बाबत मध्यवर्ती पोलीस ठाण्यात युवराज भदाणे याच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र गुन्हा दाखल होऊन १४ दिवस उलटल्यावरही फरार भदाणे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने सर्वस्तरातून पोलिसांवर टीकेची झोळ उठली आहे. उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे याने नोकरीवर लागण्यासाठी जन्मतारखेत फेरफार केल्याचा आरोप व लेखी तक्रार समाजसेवक पत्रकार दिलीप मालवणकर यांनी महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी चौकशी समिती नियुक्ती केली. चौकशी समितीने जन्मदाखल्यात फेरफार केल्याचा ठपका ठेवला. दरम्यान गेल्या महासभेने समितीच्या अहवालानुसार भदाणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानुसार महापालिका सहायक आयुक्त अच्युत सासे यांच्या तक्रारीवरून भदाणे यांच्यावर २१ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यामध्ये पीएचडी पदवी अवैध असल्याचा उल्लेख करण्यात आहे. पोलिसांनी या गंभीर गुन्ह्या प्रकरणी भदाणे याला त्वरित अटक करतील असे सर्वांना अपेक्षित होते. मात्र गेले १४ दिवस उलटल्यानंतरही पोलिसांनी भदाणे याला अटक केली नसल्याबद्दल दिलीप मालवणकर यांनी थेट पोलीसांच्या चौकशी प्रक्रियेवर प्रश्नचिन्हे उभे केले.दरम्यान नवीमुंबई येथील एपीएमसी पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी भदाणे याच्यावर गुन्हा दाखल झाला. एपीएमसी पोलीसही भदाणे यांच्या शोधात आहे. कल्याण व ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी भदाणे न्यायालयात उपस्थित राहू शकतो. मात्र पोलिसांना त्याचा ठावठिकाणा कशा लागत नाही. असा प्रश्न मालवणकर यांनी उपस्थित करून अनेक गुन्हे दाखल असलेल्या भदाणे याला पोलीस जाणीवपूर्वक अटक करीत नसल्याचा आरोप केला. तर मध्यवर्ती पोलिसांनी युवराज भदाणे यांच्यावर पोलीस पथक पाळत ठेवून असल्याचे म्हटले आहे. भदाणे याला अटकपूर्व जामीन मिळविण्या पर्यन्त पोलीस त्याला अटक करणार नाही. असा संशय मालवणकर यांनी व्यक्त करून खळबळ उडून दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक