शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

महिलेचे हात-पाय-स्तन कापून हत्या; रक्तबंबाळ अवस्थेत तिने मुलाला सांगितली आरोपींची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 6:58 PM

याप्रकरणी पोलिसांनी शकील आणि मोहम्मद जुद्दीन नावाच्या आरोपींना अटक केली आहे.

भागलपूर: दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड सारखीच एक घटना बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. भररस्त्यात नीलम नावाच्या महिलेची शरीराचे अवयव कापून हत्या करण्यात आली. महिलेच्या गावातील शकील या व्यक्तीने त्याच्या भावासोबत मिळून महिलेचे हात, कान आणि स्तन कापले. आरोपी पायही कापणार होते, मात्र कोणीतरी आल्याने दोघेही पळून गेले. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा वाटेतच मृत्यू झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी शकील आणि त्याचा भाऊ मोहम्मद जुद्दीनला अटक केली आहे. 

आईने मुलाला सांगितले शकीलचे नावमहिलेचा मुलगा कुंदन याने सांगितले की, तो आईसोबत सायकलने पिरपेंटी मार्केटला गेला होता. घरी परतत असताना त्याने आईला सिंघिया पुलापासून काही अंतरावर सोडले. आई पायी घरी जात होती, तेव्हाच शकील आणि जुद्दीनने हा हल्ला केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीने तिचा पती अशोक यादव याला फोन केला. पतीने मुलाला माहिती दिली. मुलगा आईजवळ पोहोचला तेव्हा आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. या अवस्थेतही शकीलने हातपाय कापल्याचे आईने मुलाला सांगितले.

पोलिसांनी शस्त्र जप्त केलेआरोपींनी चिकन चॉपरने महिलेचे अवयव कापले होते. पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यार जप्त केले आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून आणखी शस्त्रे जप्त केली आहेत. घटनास्थळावरून एकाची चप्पल व भांडे, तुटलेल्या बांगड्या आणि रक्ताने माखलेली मातीही सापडली आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे.

या कारणामुळे केली हत्यामृत महिलेचे पती अशोक यादव यांनी सांगितले की, तो किराणा दुकान चालवतो. त्याची पत्नी नीलमही दुकानात बसायची. मोहम्मद शकील अनेकदा कोणतेही काम नसताना त्याच्या दुकानात येत असे. एके दिवशी बायकोने त्याला हटकले आणि दुकानात येऊ नकोस, असे सांगितले. याशिवाय काही पैशांचाही वाद होता. या कारणामुळेच शनिवारी आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने वार केले.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीWomenमहिलाDeathमृत्यू