शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

ऑनलाईन लुटणाऱ्या भामट्याला पुण्यातून अटक; महाराष्ट्रातील ४, तर राज्याबाहेरील २१ गुन्ह्यांतील सहभाग उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 7:54 AM

एका व्यक्तीची टास्कच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक झाली होती. या संदर्भात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला हाेता.

नवी मुंबई : टास्कच्या बहाण्याने, तसेच इतर कारणांनी ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्याला सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. आकाश उमेश पांडे (३५) असे आरोपीचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालचा आहे. या आरोपीचा महाराष्ट्रातील ४, तर राज्याबाहेरील २१ गुन्ह्यांत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या रॅकेटमध्ये इतरही अनेकांचा सहभाग असून, त्याअनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.

एका व्यक्तीची टास्कच्या बहाण्याने १७ लाखांची फसवणूक झाली होती. या संदर्भात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला हाेता. या गुन्ह्याचा तपास पाेलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेनि गजानन कदम सपाेनि राजू आलदर, विजय आयरे, संदीप सोलाट यांनी सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे ऑनलाईन लुटणारा आराेपी पुणे परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार सापळा लावून आराेपीच्या पाेलिसांनी मुसक्या आवळल्या.

दिल्लीच्या साथीदारांसह चालवायचा रॅकेटपुण्यातील एका कंपनीत सीएचे काम करत असताना तो दिल्लीतल्या काही साथीदारांसह मिळून ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट चालवत होता. यासाठी त्याने वापरलेले बँक खाते पोलिसांनी गोठवले असून, त्यात ५ लाख ९० हजार रुपये आढळून आले आहेत, तर त्याचा राज्यातील ४ गुन्ह्यांत, तर राज्याबाहेरील २१ गुन्ह्यांत सहभाग समोर आला आहे. त्यानुसार या रॅकेटने देशभरात अनेकांना ऑनलाइन कमाईचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई