मुंबई - भांडुप पश्चिमेकडील सोनापूर लेन येथील आशियाना इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका गाळ्याला आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत.या आगीत लाखोंचा मुद्देमाल भस्मसात झाला आहे. सोनापूर परिसरातील आशियाना इंडस्ट्रीअल इस्टेट या चार मजली इमारतीत असलेल्या रेश्मा गारमेंट्समध्ये ही आग लागली होती. दुपारच्या सुमारास या इंडस्ट्रियल इस्टेट चा वीजप्रवाह खंडित झाला होता त्यानंतर वीज प्रवाह पुन्हा सुरळीत झाला असता अचानक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या रेश्मा गारमेंट मध्ये मोठा स्पार्क होऊन आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच संपूर्ण इंडस्ट्रियल इस्टेट रिकामी करण्यात आली. अग्निशमन दलाच्या 12 फायर इंजिन्सच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणण्यात आली. खरंतर या गारमेंट मालकाने ही जागा भाड्याने घेतली होती. आज भाड्याची मुदत संपल्यामुळे या गारमेंट्स शिफ्टिंग सुरू होतं. त्याच दरम्यान ही घटना घडली आणि लाखोंचे नुकसान झालं.
भांडुपच्या आशियाना इंडस्ट्रीजमध्ये लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 7:14 PM
आज भाड्याची मुदत संपल्यामुळे या गारमेंट्स शिफ्टिंग सुरू होतं.
ठळक मुद्देया आगीत लाखोंचा मुद्देमाल भस्मसात झाला आहे . सोनापूर परिसरातील आशियाना इंडस्ट्रीअल इस्टेट या चार मजली इमारतीत असलेल्या रेश्मा गारमेंट्समध्ये ही आग लागली होती.