शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

3 लव्ह मॅरेज, कधी बनली अफसाना तर कधी अंजली; तिसऱ्या पतीने केली हत्या, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 12:12 PM

Crime News : हत्येच्या घटनेनंतर आरोपी विनोद यानेच भव्याच्या माहेरी फोन करून सूचना दिली होती. त्यानंतर पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.

Crime News : गाझियाबादच्या भव्या शर्मा हत्याकांडाबाबत पोलिसांच्या चौकशीतून नवनवीन खुलासे होत आहेत. असं सांगण्या आलं की, भव्याने तीन लग्ने केली होती. पण तिचा तिसरा पती विनोद शर्मासोबत राहत असतानाही ती तिच्या दुसऱ्या पतीसोबत बोलत होती. याच्याच रागात विनोद शर्माने  चाकूने वार करत भव्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हत्येच्या घटनेनंतर आरोपी विनोद यानेच भव्याच्या माहेरी फोन करून सूचना दिली होती. त्यानंतर पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं की, तरूणीच्या पोटात चाकू मारण्यात आला होता. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. 

आरोपी तरूणीच्या मृत्यूबाबत वेगवेगळा जबाब देत होता. त्याच्यावर पोलिसांना संशय आला. विनोदने 25 डिसेंबरला भव्याची हत्या केली होती. त्याने पोलिसांना सांगितलं की, भव्या त्याला दगा देत होती. 

आरोपी विनोदने संगितलं की, भव्याचा दुसरा पती अनीशने त्याला गाझियाबाद सोडून जाण्याची धमकी दिली होती. तो म्हणाला होता की, मी असं केलं नाही तर माझा जीव जाईल. भव्या नोकरी करत होती आणि तिच्या कमाईनेच घर चालत होतं. विनोद काही कामधंदा करत नव्हता. भव्याच्या भावाने विनोद विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.

विनोदने सांगितलं की, हत्येच्या दिवशी दोघेही दारू प्यायले होते. यावेळी भव्याला त्याने जास्त दारू पाजली. नंतर संधी बघून त्याने भव्याच्या पोटात चाकू मारला. भव्याने काही वर्षांआधीच पोटाचं ऑपरेशन केलं होतं. त्यामुळे तिच्या पोटावर कटच्या खुणा होत्या. विनोद मुद्दाम त्याच ठिकाणी चाकूने वार केला. 

भव्याने तीन लग्ने केली होती. त्यातील दोन तरूण हिंदू होत. तिघांसोबतही तिने लव्ह मॅरेज केलं होतं. भव्या आधी मुस्लिम होती. ती सीतामढीला राहत होती. पण नंतर तिचा परिवारा गाझियाबादच्या सिद्धार्थ विहारमध्ये शिफ्ट झाला. लग्नाआधी तिचं नाव बेबी होतं. पण पहिल्या लग्नानंतर तिने  नाव बदलून अंजली ठेवलं. तेच दुसऱ्या लग्नावेळी तिचं नाव अफसाना आणि तिसऱ्या लग्नावेळी भव्या केलं. पहिलं लग्न 2004 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या योगेंद्र कुमार सोबत झालं होतं. दोघांना एक मुलगाही आहे. नंतर अनीशसोबत 2017 मध्ये निकाह केला. त्यानंतर तिची भेट गुरुग्रामच्या विनोद शर्मासोबत झाली. दोघांनी 2019 मध्ये लग्न केलं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी