शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

भाईंदरच्या इसमाचे डिमॅट खाते हॅक करून त्यातील शेअर विकून ३७ लाखांना फसवले

By धीरज परब | Published: November 23, 2023 8:05 PM

भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर भागात राहणारे प्रमोदकुमार सुराणा हे फोर्ट येथील कंपनीत मुख्य अकाउंटंट म्हणून नोकरी करतात

मीरारोड - भाईंदरच्या एका इसमाचे डिमॅट खाते ईमेल द्वारे हॅक करून त्याद्वारे त्यांच्या डीएमटी खात्यातील ३७ लाख ६२ हजारांचे शेअर एका दिवसात परस्पर विकून त्यांची फसवणूक केली गेली आहे . भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी २२ नोव्हेम्बर रोजी गुन्हा दाखल केला असून शेअर विकले त्याचा आयपी एड्रेस हा अमेरिकेच्या लॉस अँजेलिस भागातील आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर भागात राहणारे प्रमोदकुमार सुराणा हे फोर्ट येथील कंपनीत मुख्य अकाउंटंट म्हणून नोकरी करतात . त्यांनी २०१७ पासून चॉईस इक्विटी ब्रोकिंग ह्या ब्रोकर कंपनीचे डिमॅट खाते उघडले असून त्यातून ते शेअर खरेदी विक्री व्यवहार करतात . २१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वा. त्यांना मेलचा पासवर्ड रिसेट करण्याचा संदेश आला असता त्यातील ओटीपी त्यांनी कोणास दिला नव्हता . मात्र काही वेळातच त्यांच्या डिमॅट खात्यातील असलेले तब्बल ३७ लाख ६२ हजार मूल्यांचे शेअर व ऑप्शन मधले शेअर हे विक्री करण्यात आले . तसे संदेश मिळाल्या नंतर त्यांनी संबंधितांना कॉल करून स्वतःचे आणि कुटुंबियांचे डिमॅट व ट्रेडिंग खाते ब्लॉक करण्यास सांगितले . 

सदर घडला प्रकार त्यांनी चॉईस इक्विटी ब्रोकिंगचे रामरतन चिरनिया व सुनील बगारीया यांना तसेच अनुपालन अधिकारी स्वाती मटकर यांना सांगितला . परंतु त्यांच्या कडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी वांद्रे येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती . ती तक्रार मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर शाखे कडे आले . कंपनी कडून मिळालेल्या त्या दिवशीच्या विक्री व्यवहाराचा आयपी एड्रेस हा अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथील दाखवला होता . 

ईमेल आयडी द्वारे लॉग इन करून शेअर ट्रेडिंग कधीच केले नसून ब्रोकर कंपनीने सुरक्षेची काळजी न घेता आपल्या संमती शिवाय शेअर विक्री करून फसवणूक केल्याच्या फिर्यादी वरून भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस . एस . नाईकवाडी हे तपास करत आहेत .