शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्यास १ कोटीचे बक्षीस जाहीर करणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 2:10 PM

Nupur Sharma : सतपाल तन्वर यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, जो कोणी नुपूर शर्माची जीभ कापेल, त्याला एक कोटीचे बक्षीस दिले जाईल.

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना धमकी देणाऱ्या भीम आर्मीच्या प्रमुखावर दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने भीम आर्मीचे प्रमुख नवाब सतपाल तन्वर यांना भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना फोन करून धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. सतपाल तन्वर यांनी यापूर्वी घोषणा केली होती की, जो कोणी नुपूर शर्माची जीभ कापेल, त्याला एक कोटीचे बक्षीस दिले जाईल.

नुपूर शर्मा  यांनी मोहम्मद पैगंबराचा अपमान केला आहे. त्यामुळे करोडो मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. मोदी सरकार जाणूनबुजून नुपूर शर्माला अटक करत नाही आहे. नुपूर शर्मा ही कानपूर हिंसाचाराची खरी सूत्रधार आहे. योगी सरकारने त्यांना आरोपी का बनवले नाही असा प्रश्न भीम सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवाब सतपाल तन्वर यांनी उपस्थित केला.

मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पक्षातून निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता मुंबई पोलीस समन्स पाठवू शकतात. पायधुनी पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे सांगितले जात आहे. रझा अकादमीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

नूपुर शर्मा यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस पाठवू शकतात समन्स

नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त टिपण्णीवरून बराच गदारोळ झाला आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेपासून ते कतार, कुवेत, इराण आणि पाकिस्तानने नाराजी व्यक्त केली आहे. भारताच्या आसपास, इस्लामिक सहकार्य संघटनेने (ओआयसी) भारताला घेरत संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना भारतातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या विरोधात आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले होते. ओआयसीच्या वतीने भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात वाढ झाल्याचे सांगण्यात आले होते.दुसरीकडे, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत नुपूर शर्मा यांना भाजपमधून निलंबित करून चालणार नाही, असे म्हटले होते. नुपूर शर्माच्या अटकेची मागणी त्यांनी केली होती.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी