शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

पोलिसांनी आवळल्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या; लाखोंचे महागडे मोबाईल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2021 7:02 PM

पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपी अमनची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत मोबाईल हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली.

ठळक मुद्देपोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपी अमनची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत मोबाईल हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली.

भिवंडी ( दि.६ ) भिवंडी शहरात अनलॉक काळापासून चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखोंचे महागडे मोबाईलसह रेडिमेड कपड्याची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळ्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे या चोरट्यांकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. अमन सुलतान मोमीन (वय १९ रा. समदनगर ) जैद अब्दुल खालीक अन्सारी ( वय २३ रा.  इस्लामपुरा ) आणि  मायकल ( वय १९)  असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून आतापर्यत  एकूण ५ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

जगदीश हिराजी देसले (वय ३२) हे कामानिमित्ताने १७ मार्च २०२१ रोजी भिवंडीतील ताडाळी जकात नाकामार्गे पाईपलाईन रोडने पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या २ चोरट्यांनी त्यांना लाकडी दांडक्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून १० हजार ६०० रुपयांचा मोबाईल हिसकवून पळ काढला. त्यांनतर त्यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात त्या २ चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सदर चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहा पोलीस आयुक्त किसन गावीत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे)  अजय कांबळे यांनी पोलीस तपास पथकासह या चोरट्यांचा शोध सुरु केला असता गुप्त बातमीदाराच्या मदतीने मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी अमन व त्याचा एक साथीदार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा  शोध घेऊन आरोपी अमनला भिवंडीतून अटक केली.

पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या आरोपी अमनची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारासोबत मोबाईल हिसकावून पळ काढल्याची कबुली दिली. त्यांनतर त्याला पोलीस कोठडी सुनावली असता पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आतापर्यत एकुण ३६ मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली. सदर मोबाईलची किमंत ४ लाख ७० हजार रूपये असून सर्व मोबाईल त्याच्याकडुन हस्तगस्त करीत त्याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे असा एकुण ५ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी जैद अब्दुल खालीक अन्सारी व  मायकल याही चोरट्याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता फ्लिपकार्ड कंपनीच्या गोडावुनमधुन त्यांनी लंपास केलेले शर्ट, पॅन्ट, शर्ट पिस, कोट, लॅपटॉप कवर, मोबाईल कवर, फेस शिल्ड, एल सी डी स्टॅन्ड असा एकुण ५४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच आणखी काही मुद्देमाल त्यांनी कोठून चोरला आहे का ? याचा तपास पोलिसांनी सुरु केला. तर  या गुन्हयातील २ आरोपी अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसbhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल