बोंबला! २५ लाखांची लॉटरी पडली महागात; तरुणानं एका क्षणात गमावले ३ लाख रूपये....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 05:25 PM2021-05-12T17:25:55+5:302021-05-12T17:26:19+5:30
या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊन अरमान अलीने सांगितलं गेलेल्या अकाउंटमध्ये तीन लाख रूपये ट्रान्सफर केले होते.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये लॉटरी लागल्याचं खोटं सांगत त्याची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. पीडित अरमान अलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने फोन करून अरमानला २५ लाख रूपयांची लॉटरी लागल्याचं सांगितलं.
लॉटरीचा चेक देण्याआधी आरोपीने सिक्युरिटी म्हणून तीन लाख रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले.
पोलिसांनुसार या प्रकरणाची तक्रार अरमान अलीने सायबर क्राइमकडे केली होती. ज्यात सांगण्यात आलं की, एका अज्ञात व्यक्तीने त्याला फोन केला होता. फोन करणाऱ्याने सांगितलं की, तुमचा नंबर करोडपतीच्या लॉटरी लागला आहे. ज्यामुळे तुमच्या नावाने चेक काढायचा आहे. यासाठी सिक्युरिटी म्हणून तीन लाख रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करावे लागतील. (हे पण वाचा : लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी चोरली बस, चार जिल्हे पारही केले पण गावी पोहोचू शकला नाही....)
या अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊन अरमान अलीने सांगितलं गेलेल्या अकाउंटमध्ये तीन लाख रूपये ट्रान्सफर केले होते. पैसे मिळतात त्या अज्ञात व्यक्तीने फोन केला होता आणि पुन्हा २५ हजार रूपये ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलं. त्याने जेव्हा सांगितले की, त्याच्याकडे पैसे नाही तर तो सात हजार रूपये ट्रान्सफर करण्यास सांगितलं. (हे पण वाचा : आधी प्रेम, मग अत्याचार! पतीच्या मदतीने महिलेने केली बॉयफ्रेन्डची हत्या....)
फोन करणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर अरमान अलीला जरा शंका आली. त्याला समजलं की, त्याला कुणीतरी फसवलं. यानंतर त्याने पोलिसात याबाबत तक्रार दिली. एसपी नार्थ विजय खत्री म्हणाले की, तक्रार सायबर क्राइमच्या शाखेत केली गेली होती. नंतर श्यामला हिल्स पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवून घेतली. ते म्हणाले की, ज्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले त्यांची माहिती काढण्यात आली आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल.