१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 12:28 PM2024-09-27T12:28:19+5:302024-09-27T12:40:32+5:30

इमारतीतील फ्लॅटमध्ये पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

bhopal flat girl corpse murder suspicion three suspects arrested police crime | १५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य

१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये गुरुवारी एका बहुमजली इमारतीतील फ्लॅटमध्ये पाच वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, तपासानंतर याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संताप व्यक्त होत आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी अनेकांनी पोलीस ठाण्यात निदर्शनेही केली.

पीटीआयला या घटनेबाबत माहिती देताना भोपाळचे पोलीस आयुक्त एचसी मिश्रा म्हणाले की, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी एक व्यक्ती, त्याची आई आणि बहिणीला अटक करण्यात आली आहे. मुलीच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. 

एचसी मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुलगी राहत असलेल्या इमारतीतून बेपत्ता झाल्यानंतर, तिच्या शोधासाठी ड्रोन आणि १०० पोलीस तैनात करण्यात आले होते.

पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, इमारतीतील एका फ्लॅटमध्ये मुलगी मृतावस्थेत आढळून आली. तिचा मृतदेह बाथरूममध्ये उंच शेल्फवर प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये होता. घराची झडती घेतली असता ती दिसली नाही. आरोपींना मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती आणि त्यासाठी चारवेळा प्रयत्न केला, मात्र इमारत व परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे ते होऊ शकले नाहीत.

पोलिस आयुक्त एचसी मिश्रा म्हणाले की, पोलिसांच्या पथकांनी मुलीचा शोध घेण्यासाठी सुमारे १५०० घरांची झडती घेतली. दिवसभरात मृतदेह आढळून आल्यानंतर संतप्त लोकांनी रास्ता रोको करत दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत शहाजहानाबाद पोलीस ठाण्याला घेराव घातला.

मुलीच्या कुटुंबीयांनी असा दावा केला की, त्यांनी हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी बंद फ्लॅट उघडण्यास सांगितलं होतं. पोलिसांनी त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. मृतदेह सापडल्यानंतर स्थानिक आमदार आतिफ आरिफ अकील यांनीही पोलीस ठाणे गाठलं.
 

Web Title: bhopal flat girl corpse murder suspicion three suspects arrested police crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.