लग्नाच्या नावावर तरूणीसोबत रेप, रात्रभर म्हणत राहिला - लग्न होणार, सकाळी मुंबईला झाला पसार...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:18 AM2021-06-29T11:18:20+5:302021-06-29T11:18:41+5:30
गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मॅट्रोमोनिअल साइटवर मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा बिझनेसमन इस्माइल सैय्यदसोबत मैत्री झाली. त्याने प्रोफाइलमध्ये त्याचं वय ३५ सांगितलं होतं.
भोपाळमधून बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मॅट्रोमोनिअल साइटवर ओळख झाल्यावर मुंबईतील ५० वर्षीय व्यक्तीने त्याचं वय ३५ असल्याचं सांगितलं आणि निकाहच्या नावावर तरूणीसोबत बलात्कार केला. तरूणीने ९ महिन्यांनंतर पोलिसात याबाबत तक्रार दिली. आता पोलीस आरोपीला पकडण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहे.
तक्रारीत तरूणीने सांगितलं की, तिचं वय ३१ वर्षे आहे आणि ती विदिशामध्ये नोकरी करते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये मॅट्रोमोनिअल साइटवर मुंबईच्या मालाडमध्ये राहणारा बिझनेसमन इस्माइल सैय्यदसोबत मैत्री झाली. त्याने प्रोफाइलमध्ये त्याचं वय ३५ सांगितलं होतं. तरूणीने सांगितलं की, काही दिवसातच दोघांचं निकाह ठरला. १५ सप्टेंबरला निकाह करण्याचं ठरलं होतं. (हे पण वाचा : अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अश्लील व्हिडीओ दाखवत होती तरूणी, अनेकदा ठेवले समलैंगिक संबंध)
तरूणीने सांगितलं की, माझा होणारा पती इस्माइल १५ सप्टेंबरला मुंबईहून भोपाळला आला होता. त्याच्या बोलवण्यावरून मी एका हॉटेलमध्ये गेले होते. जेव्हा मी त्याला निकाहबाबत विचारले तर तो सतत सांगत राहिला की, काझी इथेच येणार आहे. काझीची वाट बघता बघता रात्र झाली. तो मला म्हणाला आता फार रात्र झाली आहे तू इथेच थांब.
तरूणीनुसार, आरोपीने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवेल आणि लग्न न करताच मुंबईला निघून गेला. तो मुंबईला गेल्यावर तिला समजलं की त्याचं वय ३५ नाही तर ५० वर्षे आहे. तरी सुद्धा तरूणी त्याच्यासोबत लग्न करण्यास तयार होती. मात्र, इस्माइलने लग्नास नकार दिला. तरूणीने सांगितलं की, ती गेल्या ९ महिन्यांपासून त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावत आहे. पण तो तयार नाही. अखेर वैतागून तिने पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दिली.
कोहेफिजा पोलीस स्टेशनचे टीआय अनिल वाजपेयी याप्रकरणी म्हणाले की, तरूणीची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. तक्रारीनुसार, आरोपी विरोधात छेडछाड, धमकी देणे आणि जबरदस्ती करण्याचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरोपीचा मुंबईचा पत्ता लागला आहे. लवकरच एक टीम आरोपीला अटक करण्यासाठी जाईल.