Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पती-पत्नीच्या नात्याची अजब घटना समोर आली आहे. इथे एका नर्सने स्वत:ला अविवाहित सांगून गुजरातच्या तरूणासोबत लग्न केलं. त्यानंतर केवळ १७ दिवसात पतीला फसवणुकीच्या आरोप तुरूंगात पाठवलं. इतकंच नाही तर महिलेने पतीवर आरोप लावला की, त्याने स्वत:ला IAS सांगून तिच्यासोबत लग्न केलं. सोबतच तिने धमकीही दिली की, ती पहिल्या रात्रीचा व्हिडीओ व्हायरल करेल. ही धमकी देऊन पत्नीने पतीचा पासपोर्ट, पासबुक आणि कागदपत्रे जमा केले. आता महिला तरूणाला १० लाख रूपये मागत आहे. याप्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी महिलासहीत सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार नवीन गुप्ता वडोदऱ्याचा राहणारा आहे. त्याची फेसबुकवर भोपाळच्या राणी रॅकवारसोबत मैत्री झाली. २०१८ मध्ये दोघांची मैत्री प्रेमात बदलली. आरोप आहे की, राणीने नवीनला सांगितलं की, ती सिंगर आहे आणि भोपाळच्या जेके हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. नवीनला विश्वासात घेतल्यावर महिलेने तिच्या कुटुंबियांसोबत त्याचं बोलणं करून दिलं. कुटुंबियांच्या सहमतीने दोघांचा साखरपुडा झाला आणि ६ जून २०१९ ला भोपाळमध्ये त्यांचं लग्न झालं. तरूणानुसार, त्याने राणीला ८.५ लाख रूपयांच्या वस्तू दिल्या. ज्यात दागिनेही होते. तरूणाने पत्नीच्या अकाउंटमध्ये पैसेही जमा केले.
याप्रकरणी तरूणाच्या कुटुंबियांनी सांगितलं की, सगळं काही ठीक सुरू होतं. पण २३ जूनला परिवाराला धक्का बसला. महिलेने तिच्या मित्रांना सांगून पती विरोधात जयपूरमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस आले आणि नवीनला घेऊन गेले. तो साधारण तीन महिने तुरूंगात होता. यादरम्यान पत्नी त्याला एका मुलीला घेऊन तुरूंगात भेटायला येत राहिली. ही मुलगी तिच होती जी तिने सांगितली होती की, ती तिच्या बहिणीची मुलगी आहे.
यादरम्यान परिवाराने कसंतरी नवीनला तुरूंगातून बाहेर काढलं. तुरूंगातून बाहेर आल्यावर नवीनने पत्नीचा शोध घेतला तर त्याला समजलं की, राणी आधीच विवाहित आहे आणि तिला एक मुलगीही आहे. त्याला हेही सांगण्यात आलं होतं की, राणीच्या आई-वडिलांचा मृत्यू एका कार अपघातात झाला होता. लग्नावेळी राणीने जे शपथपत्र दिलं होतं त्यात तिने ती अविवाहित असल्याचं सांगितलं होतं. नंतर समजलं की, तिचं लग्न ६ वर्षाआधी प्रेम सिंह दांगी नावाच्या व्यक्तीसोबत झालं.