पालघर - आज सकाळी उधवा तलासरी जिल्हा पालघर येथे इनोव्हा गाडीमध्ये 44 बाॅक्स विदेशी मद्य 750 मिली व 180 मिली बाटल्यामधील मद्य सिलवासा येथे विक्रीसाठी असलेले जप्त करण्यात आले असून दोन इसमाना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुरत, गुजरात व अंधेरी येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दारू मुंबई येथे कोणत्या ठिकाणी जाणार होती आणि आणखी कोण - कोण इसम या प्रकरणात सामील आहेत त्या बाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. या कारवाईदरम्यान पालघर येथे उत्पादन शुल्क विभागाने १५.२० लाखांची अवैध दारू जप्त केली आहे. काल रात्रीपासून तीन ग्रुप करून भरारी पथक पालघर हे कार्यरत होते. गेल्या दोन वर्षात 76 वाहने, 298 इसमावर दारू बंदी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातील मद्य, काळागुळ, गावठी हातभट्टी दारू, ताडी परदेशी मद्य असा एकूण 5 कोटी 89 लाख किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली आहे.
Video : उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, लाखोंचा अवैध दारूचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 4:39 PM
या प्रकरणात सामील आहेत त्या बाबतचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
ठळक मुद्देया प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुरत, गुजरात व अंधेरी येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गेल्या दोन वर्षात 5 कोटी 89 लाख किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकारी सुभाष जाधव यांनी दिली आहे.