शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मोठी कारवाई! ३५ कोटींच्या फसवणूकीचा सूत्रधार अटकेत, दोन वर्षांपासून होता फरार 

By योगेश पांडे | Published: October 11, 2022 10:04 PM

सुशील कोल्हे याने त्याचा भाऊ पंकज, भागीदार भरत शंकर साहू आणि इतरांच्या मदतीने सिव्हिल लाइन्समध्ये एजीएम कॉर्पोरेशन, एजीएम डिजिटल लि., जनसेवा म्युचुअल बेनिफीट निधी या कंपन्या सुरू केल्या. कोल्हे बंधू डिजिटल मार्केटिंगमध्ये भरपूर नफा असल्याचे सांगून गुंतवणुकीची माहिती देत असत.

नागपूर : गुंतवणूकीच्या रकमेच्या दुप्पट परतावा देण्याचा दावा करत ३५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटच्या सूत्रधाराला नागपूरपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सुशील कोल्हे असे आरोपीचे नाव असून मागील दोन वर्षांपासून तो फरार होता. त्याने एजीएम कार्पोरेशन, एजीएम डिजीटल लिमीटेड, जनसेवा म्युचुअल बेनिफीट निधी व इतर शेल कंपन्या स्थापन करून त्यामाध्यमातून फसवणूक केली होती. त्याच्या अटकेने या प्रकरणातील इतर लोकांचीही नावे समोर येऊ शकतात.

सुशील कोल्हे याने त्याचा भाऊ पंकज, भागीदार भरत शंकर साहू आणि इतरांच्या मदतीने सिव्हिल लाइन्समध्ये एजीएम कॉर्पोरेशन, एजीएम डिजिटल लि., जनसेवा म्युचुअल बेनिफीट निधी या कंपन्या सुरू केल्या. कोल्हे बंधू डिजिटल मार्केटिंगमध्ये भरपूर नफा असल्याचे सांगून गुंतवणुकीची माहिती देत असत. 

तथाकथित योजनांवर १८ महिन्यांत गुंतवणुकीच्या दुप्पट, मूळ रकमेच्या अडीच टक्के आणि ४० महिन्यांपर्यंत अडीच टक्के परतावा आणि बोनस मिळेल असा दावा करायचे. पॉश हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन लोकांना आकर्षक भेटवस्तू द्यायचे. त्यामुळे लोक गुंतवणूक करू लागले. सुरुवातीला आरोपींनी लोकांना वेळेवर नफा दिला. त्यामुळे त्याचे रॅकेट देशातील अनेक राज्यात पसरले. शेजारील राज्यातून लोक मोठ्या संख्येने येऊ लागले. काही वेळाने कोल्हे बंधूंनी पैसे परत करण्यास विलंब सुरू केला. 

पोलिस खात्यात मध्यस्थ म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाचे कोल्हे बंधूंशी संबंध होते. पीडित तरुणांनी आर्थिक शाखेकडे तक्रार केली असता गुन्हा दाखल करण्यात तरुणाने अडथळे निर्माण केले. याचदरम्यान सुशीलने कार्यालय बंद करून भाऊ आणि साथीदारांसह पळ काढला. त्यानंतर नागेंद्रसिंग ठाकूर यांच्या आर्थिक शाखेने कोल्हे बंधूंविरुद्ध फसवणूक आणि एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरPoliceपोलिस