मडगाव - कॉपीराईट अॅक्टचा भंग करुन मोबाईल उपकरणे विकणाऱ्या चारजणांना गोव्यातील मडगाव येथे म्पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडील २ लाख ५८ हजार रुपयांचा माल जप्त केला. काल गुरुवारी पोलिसांनी ही कारवाई केली. अॅपल कंपनीची उत्पादने संशयित विकत होते असे तपासात आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जबराम पुरोहित , बाबुलाल राजपुरोहित , सय्यद अमजद , महादेव देवासी अशी संशयितांची नावे आहेत. अटक केल्यानंतर नंतर संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आली.दरम्यान गुरुवारच्या कारवाईनंतर मडगावात अशा प्रकारे बनावट उत्पादने विकणाऱ्या मोबाईल विक्रेत्यांचे धाबे दणादणले आहे. ग्राहकांची फसवणुक केली जात असल्याने लोकांतही चीड व्यक्त होत आहे. यापुढेही अशा प्रकारे कारवाई व्हावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक विक्रेते सदया पोलिसांच्या रडावर आहेत.यशवंत मोहिते हे तक्रारदार आहेत. संशयितांवर कॉपी राईट अॅक्ट १९५७ अंतर्गंत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदाराने तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या मोबाईल दुकानावर जाउन वरील कारवाई केली. एकंदर दोन लाख ५८ हजार ६00 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विश्वजित ढवळीकर पुढील तपास करीत आहेत.
गोव्यात कॉपीराईट अॅक्टअंतर्गंत मोठी कारवाई, २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त, चार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 1:23 PM