लखनऊच्या काकोरी पोलिस स्टेशन परिसरातील दुबग्गा परिसरात उत्तर प्रदेश एटीएस गेल्या पाच तासांपासून शोधमोहीम राबवित आहे. त्यात एटीएस कमांडोचा समावेश आहे. येथे गॅरेजमध्ये अल कायदाच्या दहशतवाद्यांना लपवल्याबद्दल एटीएसला इनपुट मिळाले होते. त्यानंतरच्या कारवाईत आतापर्यंत दोन दहशतवादी पकडले गेले आहेत. कमांडो तीन घरांची झाडाझडती घेत आहेत. मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केल्याची माहिती आहे. एटीएसने ५०० मीटरच्या दूरवरच्या जवळपासची घरे रिकामी केली आहेत. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसही घटनास्थळी आहेत. दोन अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे मिनाज आणि मसरुद्दिन अशी आहेत. तर मंडवीय येथून देखील एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले असून एटीएसच्या कारवाईआधी 3 दहशतवादी पळाले आहेत. तसेच अटक दहशतवाद्यांच्या चौकशीत भाजपाचे बडे निशाण्यावर असल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.
एटीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ऑपरेशन संपल्यानंतरच काही खुलासा करता येईल. बॉम्ब बनविण्याच्या साहित्याही जप्त केल्याची माहिती मिळत आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकालाही घटनास्थळी बोलावले आहे. हे दहशतवादी बाजारपेठ असलेल्या गजबजलेल्या शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. काही मोठे राजकीय नेतेही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, सुनील बन्सल यांच्यासह अनेक नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. आयबी, एटीएस आणि इंटेलिजेंस टीम चौकशी करत आहेत. या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते. शाहिद नावाच्या व्यक्तीच्या घरात हे दहशतवादी लपून बसून आपला कट रचत होते.याबाबत एटीएसला एका आठवड्यापासून खबर लागली होते. त्यामुळे एक आठवड्यापासून एटीएसची या घरावर नजर होती. दोन - तीन संशयित व्यक्ती या घरात ये- जा करत होते. आज छाप्यादरम्यान ६ ते ७ किलो स्फोटकं जप्त करण्यात आले आहे. या एटीएसच्या मोठ्या कारवाईदरम्यान रायबरेली, सीतामढी आणि रायबरेलीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.