अजित पवारांना मोठा दणका; आयकर विभागाने जप्त केली १ हजार कोटींची मालमत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 04:30 PM2021-11-02T16:30:19+5:302021-11-02T18:33:13+5:30
Ajit Pawar's properties worth Rs 1,000 crore attached by I-T Dept : आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणली आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात आयकर विभागाने खूप मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे राज्यातले राजकारण खवळले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची १ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा धडाका लावला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या अटकेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. आयकर विभागाने अजित पवार यांच्याशी निगडीत ५ संपत्तीवर जप्ती आणली आहेत. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून अजित पवार(Ajit Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार केली होती. बेनामी पद्धतीने संपत्ती गोळा करण्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली होती.
अजित पवार (स्वत:), त्यांची पत्नी सुनेत्रा अजित पवार, मुलगा पार्थ अजित पवार, आई आशा अनंतराव पवार, बहीण विजया मोहन पाटील, जावई मोहन पाटील, बहीण नीता पाटील यांच्या बँक खात्यात ही बेनामी आवक आल्याचे व्यवहार आढळून आले आहेत. तसेच गेले १९ दिवस आयकर(Income Tax) आणि आता ईडीचे धाडसत्र आणि शोध ऑपरेशन(सर्च) सुरु आहे. १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे, त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोकड, दागिने (ज्वेलरी), आर्थिक व्यवहारांचे कागदपत्र इ. इन्कम टॅक्सच्या हाती लागले असल्याचे ट्विटद्वारे माहिती किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यानंतर आता आयकर विभागाने ही संपत्ती जप्त केल्याने अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.
प्राप्तिकर विभागाने (Income Tax Dept) अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांचे नरिमन पॉइंट निर्मल बिल्डिंग कार्यालय आणि अजित पवार यांच्या आई, पत्नी, बहिणी, जावई... यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत असे समजते @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 2, 2021
खालील संपत्ती जप्त
जरंडेश्वर साखर कारखाना – अंदाजित किंमत ६०० कोटी
दक्षिण दिल्लीतील फ्लॅट – २० कोटी
पार्थ पवार निर्मल ऑफिस – २५ कोटी
निलय नावाचं गोव्यातील रिसोर्ट – २५० कोटी
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या जमिनी – जवळपास ५०० कोटी
Income Tax attached Properties of Ajit Pawar
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 2, 2021
1. Jarandeshwar sugar factory
₹600 crore
2. South Delhi flat ₹20 crores
3. Nirmal office of Parth pawar
₹25 crores
4. Goa Resort "Nilaya" of ₹250 crores @BJP4Indiapic.twitter.com/jObd05BNde