कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 09:39 PM2022-03-20T21:39:57+5:302022-03-20T21:42:33+5:30

'Y' security for judges who decide to ban hijab in college premises : आता कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे. 

Big decision, 'Y' security for judges who decide to ban hijab | कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' सुरक्षा

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' सुरक्षा

Next

देशभरात निर्माण झालेल्या हिजाब वाद प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालाने निकाल दिला. महाविद्यालयीन परिसरात हिजाबवर बंदी घालण्याचा निर्णय कर्नाटकउच्च न्यायालयाने दिला. नंतर आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. महाविद्यालयात हिजाब बंदीचा निर्णय देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकी देण्याचा प्रकार धक्कादायक समोर आला आहे. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने या प्रकरणाचा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना 'Y' दर्जाची सुरक्षा दिली आहे. 

हिजाब प्रकरणाचा निकाल देणाऱ्या तीनही न्यायाधीशांना आम्ही 'Y' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे न्यायाधीशांना मिळालेल्या धमकी प्रकरणाबाबत डीजी आणि आयजी यांना विधानसौधा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले आहेत.

Web Title: Big decision, 'Y' security for judges who decide to ban hijab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.