तारापूर : तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपनीमधील ट्रान्सफार्मरचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की जवळपास 8 ते 10 किमीपर्यंत हादरे जाणवले. या स्फोटामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून कंपनीच्या मालकासह 6 जण जखमी झाले आहेत.मृतांमध्ये अन्सारी इलियास, निशू राहुल सिंग, मादुरी सिंग, गोलू सुरेंद्र यादव, राजमती सुरेंद्र यादव यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये मुलायम जगदबहाद्दूर यादव, रोहित सिंग, नटवरलाल पटेल यांचा समावेश आहे. पटेल हे या कंपनीचे मालक आहेत. तर प्राची राहुल सिंग आणि रुतिका सिंग या दोन लहान मुलींच्या डोक्याला जखम झाली आहे.
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदततारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली असून जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे.