मुंबई : मुंबईत पाऊस थांबलेला असताना बोरिवलीमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीमध्ये १२ ते १५ फ्लॅट होते अशी माहिती मिळत आहे.
या इमारतीचा मोठा भाग कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली आहे. यानुसार अग्निशमन दलाचे जवान, अॅम्बुलन्स आदी घटनास्थळी निघाल्या आहेत. या इमारतीमध्ये रहिवासी राहत नव्हते. धोकादायक इमारत असल्याने रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. अर्ध्या तासापूर्वी ही इमारत कोसळली आहे. साईबाबा नगरमधील गितांजली ही इमारत आहे.
दहिहंडीमुळे सुटी असल्याने या इमारतीमध्ये रहिवासी अधिक असल्याची शक्यता आहे. 8 फायर इंजिन, 2 रेस्क्यू व्हॅन, 1 QRV, 1 कमांड पोस्ट वाहन, 3 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
तीस पस्तीस वर्षे जुनी इमारत. ए विंगची इमारत. बिल्डरसोबत करार होत होता. आज सकाळीच घरे खाली केली. बारा साडेबाराच्या सुमारास इमारत कोसळली. - सुनिल राणे, आमदार.