शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

मोठी बातमी! २० हजारांच्या लाचेची मागणी करणारा माढ्यातील भूकरमापक अटकेत

By appasaheb.patil | Published: March 01, 2023 5:45 PM

आप्पासाहेब पाटील,  सोलापूर : माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या ...

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : माढा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास २० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात लोकसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

प्रशांत भारतराव कांबळे (वर्ग ३, ) असे ताब्यात घेतलेल्या भूकरमापकाचे नाव आहे. दरम्यान, तक्रारदार यांची मौजे रोपळे (क) येथील गट नं ५४५ वरील शेत जमिनीची मोजणी झाल्यानंतर सदर जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशा वर उपअधीक्षक यांची सही घेऊन देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, माढा येथील भूकरमापक प्रशांत कांबळे यांनी २० हजार लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील लोकसेवक कांबळे यांनी तक्रारदाराकडे शेतजमिनीच्या जमीन मोजणी व हद्द कायमचा नकाशावर उपअधीक्षकांची सही घेऊन देण्यासाठी २० हजाराची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, ही कारवाई सहा. पोलिस आयुक्त गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पकाले, किणगी, उडाणशिव यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरBribe Caseलाच प्रकरण