बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु पार पडली. मात्र, कोर्टाने आर्यन खानचा जामीन फेटाळून लावला आहे. मुंबईत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट, मुनमुन धामेचा, विक्रांत चोकर, इस्मीत सिंग, नुपूर सारिका, गोमित चोप्रा आणि मोहक जसवाल यांना प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या आठ जणांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. काल एनसीबीने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे यांनी एस्प्लेनेड कोर्टात अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर आज कोर्टात जोरदार खडाजंगी झाली.
मानेशिंदे यांनी 36 ए पुन्हा दिसू शकते. एनडीपीएस कायद्याच्या 36 ए मध्ये जामीन मंजूर करण्याबद्दल नव्हे तर खटल्याबद्दल बोलले आहे. जामीन मंजूर करण्यासाठी कलम 437 सीआरपीसी वाटते. फक्त 27 ए लागू केले जाते म्हणून संपूर्ण प्रकरण, तो आरोप माझ्यावर फोडता येणार नाहीमी एका श्रीमंत कुटुंबातून आलो आहे याचा अर्थ असा नाही की, मी पुराव्याशी छेडछाड करेन असा युक्तिवाद केला. तर एएसजी अनिल सिंग यांनी एका गुन्ह्यात १७ जणांचा सहभाग असलेले हे प्रकरण आहे. दुवा, संबंध आणि सहभागाचा मुद्दा बाजूला… तपास प्राथमिक टप्प्यावर असल्याचे सांगितले. तसेच पुढे सिंग म्हणाले, लोक किती प्रभावशाली आहेत. याचा विचार करावा लागेल. छेडछाड होण्याची शक्यता आहे. तसेच हे काही वेगळे प्रकरण नाही. जामिनाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारचे संरक्षण तपासात अडथळा आणेल असा एनसीबीचे वकील सिंग यांनी युक्तिवाद केला.
न्यायालयाने या आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र काल कोरोनाच्या कारणास्तव एक रात्र तुरुंगाऐवजी आर्यनसह इतर आरोपींना एनसीबी कार्यालयात काढावी लागली. आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आलं आहे. तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आलं आहे. आर्यनसह इतर आरोपीना ३ ते ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये त्यांना ठेवण्यात येईल.