सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. सुशांत आणि त्याची बहीण प्रियांका यांच्यातील चॅट उघडकीस आले आहे. 8 जून रोजी रिया चक्रवर्ती सुशांतच्या घरी उपस्थित असताना अभिनेता सुशांत आपली बहीण प्रियंकाशी मेसेंजरवर बोलत होता, अशी माहिती सूत्रांनी इंडिया टुडेला दिली आहे. सकाळी दहाच्या सुमारास सुशांत बहीण प्रियंकाशी बोलत होता. यादरम्यान प्रियंकाने सुशांतला 1 आठवड्यासाठी Librium capsule घेण्यास सांगितले. मग न्याहारीनंतर nexito 10mg दररोज खाण्यास सांगितले गेले. ही सर्व संभाषणे मेसेंजर अॅपवर झाली.सूत्रानुसार प्रियंकाने आपल्या भावाला SOSसाठी Lonazep tablet स्वतःजवळ ठेवण्यास सांगितले होते. जेणेकरून एंजाइटी अटॅक आल्यास सुशांत त्या औषधाचा वापर करू शकेल. सुशांतने प्रियांकाला सांगितले होते की, ही औषधे खरेदी करण्यासाठी तिला प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता लागते. त्यानंतर प्रियांकाने प्रिस्क्रिप्शनची व्यवस्था केली होती. या चॅटमुळे डॉक्टरांना न दाखवता आणि त्यांची प्रकृती पाहिल्याशिवाय सुशांतला मेडिकेशन कसे देण्यात आले आहे याविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सूत्रांनी इंडिया टुडेला याची माहिती दिली आहे की, डॉ. तरुण कुमार सुशांतचे कौटुंबिक मित्र होते. या डॉक्टरांनी ही औषधे दिली होती. यासाठी सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेण्यात आला होता.प्रियंकाने सुशांतला मेसेज पाठवून सांगितले की, तिची मैत्रीण सुप्रसिद्ध डॉक्टर आहे आणि ती अभिनेताला मुंबईच्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांशी ओळख करून देईल. त्यानंतर प्रियंकाने प्रिस्क्रिप्शन शेअर करुन सुशांतला त्याविषयी माहिती दिली. प्रियंकाने सुशांतला दिलेली Librium , Nexito 10 mg आणि Lonazep औषधे अशी होती.प्रियंका आणि सुशांत यांच्यात काय चॅट झालेलं, जाणून घ्या.
प्रियंका- पहले एक हफ्ते तक Librium लो फिर नाश्ते के बाद रोजाना एक बार nexito 10 mg लो. Lonazep साथ में रखो जब भी एंजाइटी अटैक आए ले लेना.सुशांत- ओके सोनू दी.सुशांत- कोई भी इन दवाइयों को प्रिस्क्रिप्शन के बिना नहीं देगा.प्रियंका- मुझे देखने दो अगर मैं मैनेज कर सकूं तो.इसके बाद प्रियंका ने अपने भाई सुशांत को एक मिस्ड वॉइस कॉल की.प्रियंका- बाबू मुझे फोन करो. मुझे प्रिस्क्रिप्शन भेजनी है.प्रियंका- मेरी दोस्त एक जानी मानी डॉक्टर है जो तुम्हें मुंबई के बेस्ट डॉक्टर्स से कनेक्ट कर सकती है. सब कॉन्फिडेंशियल है. इसलिए परेशान मत होना.प्रियंका- बस कॉल करो.प्रियंका- एक अटेचमेंट भेजा है (प्रिस्क्रिप्शन)प्रियंका- बाबू ये प्रिस्क्रिप्शन है.प्रियंका-ये दिल्ली से है लेकिन ये मैटर नहीं करना चाहिए. अगर कुछ हुआ हो तो इसे ऑनलाइन कंसलटेशन बता सकते हैं.सुशांत- ओके, थैंक्यू सो मच सोना दी.ही तीन औषधे कोणत्या रोगासाठी वापरली जातात?Librium कॅप्सूलचा वापर एंजाइटी आणि वेगवान अल्कोहोल माघार घेण्याच्या उपचारांसाठी केला जातो. याचा उपयोग सर्जरी करण्यापूर्वी भीती दूर करण्यासाठी आणि एंजाइटीसाठी देखील केला जातो. हे औषध बेंझोडायजेपाइन नावाच्या औषधांच्या श्रेणीचे आहे. ज्याचा मेंदू आणि नसावर परिणाम होतो. जेणेकरून शांत प्रभाव निर्माण होऊ शकेल. नेक्सिटो 10 एमजी टेब्लेटचा वापर औदासिन्य आणि चिंताग्रस्त डिसऑर्डर सामान्य करण्यासाठी केला जातो. Lonazep Tablet हे एक औषध लिहिलेले आहे. हे औषध फिट, जळजळ, चिंताग्रस्तपणा आणि हृदयविकाराच्या उपचारासाठी वापरले जाऊ शकतो. हे औषध तंत्रिका पेशींची असामान्य आणि एक्सेसिव एक्टिविटी कमी करण्यास आणि मन शांत करण्यास मदत करते.सुशांत-प्रियांकाच्या चॅटने हे प्रश्न उपस्थित केलेआतापर्यंत सुशांतच्या कुटुंबीयांनी असे म्हटले आहे की, अभिनेत्याच्या आजारपणाबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. या चॅटमधून हे उघड झाले आहे की, सुशांतच्या कुटुंबीयांना सुशांतच्या आजारापणाबद्दल माहिती होती. अभिनेत्याच्या कुटूंबाने म्हटले होते की, रिया सुशांतला औषध देत असे, पण प्रियंकाने सुशांतला औषध दिल्याचे चॅटमधून उघड झाले आहे. 8 जून रोजी प्रियांका सुशांतच्या संपर्कात होती. दुपारी 12 नंतर रिया घराबाहेर पडली. त्याचवेळी प्रियांकाने सकाळी 10 वाजता सुशांतशी मेसेंजरद्वारे बातचीत केली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
सुशांत आत्महत्येच्या तपासातील पोलीस अधिकाऱ्याला कोरोना; CBI पथकाचीही होणार टेस्ट
संदीप सिंहच्या चौकशीसाठी आलेल्या तक्रारी सीबीआयकडे पाठवणार, अनिल देशमुखांनी दिली माहिती
जंगलात आढळला शिर नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, बलात्कार करून हत्या केल्याची शक्यता