शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीची जोरदार मुसंडी, द्विशतक ठोकत 212 जागांवर घेतली आघाडी; मविआची मोठी पिछेहाट, असं आहे आतापर्यंतचं चित्र
2
Maharashtra Assembly Election Results : सुरुवातीच्या कलात काँग्रेसला धक्का; बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम पिछाडीवर!
3
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजपाची शतकी खेळी, शिंदेसेनेची हाफ सेंच्युरी; मविआची पिछेहाट, महायुतीची मुसंडी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात मोठी घडामोड; शरद पवारांचा शिलेदार ७३४४ मतांनी पिछाडीवर
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
7
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर गेले, सरवणकर दुसऱ्या, पहिला कोण?
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुती-महाविकास आघाडीत ‘काँटे की टक्कर’; भाजपाला सर्वाधिक आघाडी, मनसेची स्थिती काय?
9
Jogeshwari Vidhan Sabha Election Results 2024 : जोगेश्वरीत रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आघाडीवर, सुरुवातीच्या कलात महायुतीची जोरदार मुसंडी
10
Kopri-Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live : ठाण्यातील कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर, केदार दिघे पिछाडीवर…
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अजित पवारांची घरवापसी? उद्धव ठाकरे भाजपासोबत? महाराष्ट्रात सरकार स्थापनेची ५ समीकरणे
12
कोकणात राणे बंधुंपैकी एक आघाडीवर, एक पिछाडीवर; सिंधुदूर्गचा कल कोणाकडे....
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांत खल्लास! टीम इंडियाला मिळाली अल्प आघाडी
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights :भाजपाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल?, राहुल नार्वेकरांनी स्पष्टचं सांगितलं
15
शेअर बाजारात ५ महिन्यांचा उच्चांक; गुंतवणूकदारांनी ७.१५ लाख कोटी कमावले
16
अजित पवार गट टेन्शनमध्ये! येवल्यातून भुजबळ, अणुशक्ति नगरमधून नवाब मलिक पिछाडीवर
17
झारखंडमध्ये एनडीए आणि ‘इंडिया’त टफफाईट, सुरुवातीच्या कलांमध्ये दिसतंय असं चित्र
18
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 3:34 PM

Sushant Singh Rajput Case : रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे.

ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत यांचे वडील के के सिंह यांनी डॉ. सुजैन वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांत राजपूत प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला आज अटक केलीआहे. तिच्या अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल. एनसीबी कार्यालयात सध्या

सुशांत राजपूत प्रकरणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाला आज अटक केलीआहे. तिच्या अटकेनंतर रियाला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात येईल. सायंकाळी पाचच्या सुमारास वैद्यकीय तपासणी होईल. एनसीबी कार्यालयात सध्या रियाची तिसर्‍या दिवशी चौकशी केली जात आहे. रियाचा भाऊ शोविक आधीपासूनच ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या अटकेत आहे. एनसीबीने एनडीपीएस ऍक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने रियाचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. सुशांत सिंग राजपूत यांचे वडील के के सिंह यांनी डॉ. सुजैन वॉकरविरोधात तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी डॉक्टरविरूद्ध मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे. सुजैन वॉकर हा सुशांतचा थेरपिस्ट होता. सुशांतच्या मानसिक आजारावर त्यांनी जबाब दिला आहे आणि अभिनेत्याला बायपोलर डिसऑर्डर असल्याचीही माहिती दिली होती.

 

 बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आता NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावलं होतं. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यावेळी ती अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. आज रियाच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने कडक कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात शोविक आधीपासूनच एनसीबीच्या ताब्यात आहे. त्याचवेळी एनसीबीची रियाची चौकशी सुरूच आहे. आज तिसर्‍या दिवशी एनसीबीने पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलावले आहे. अटकेची तलवार रियाच्या डोक्यावर टांगलेली आहे. दुसरीकडे आता रिया देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सोमवारी रियाने वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांत सिंगची बहीण प्रियंकाविरूद्ध तक्रार दाखल केली. रियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. एनसीबीच्या तिसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. तिने ड्रग्स घेतल्याची माहिती आज पहिल्यांदाच अडखळत सांगितली. यापूर्वी रिया ठाम होती की तिने कधीही ड्रग्ज घेतले नाही. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबी २५ बॉलिवूडसेलिब्रिटींना बोलावणार आहे. रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

 

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीArrestअटकDrugsअमली पदार्थMedicalवैद्यकीय