बिहार विधानसभा निवडणुकांकडे पाहता दरभंगा पोलिसांनी चालवलेल्या अभियानाला मोठे यश मिळाले आहे. एका स्कॉर्पिओकडून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपये जप्त केले. तसेच वाहनावरील दोन जणांना अटक केली.दरभंगाच्या विशनपूर पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांनी केलेल्या सखोल वाहन तपासणीदरम्यान दरभंगाकडे येणार्या स्कॉर्पिओमधील सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यासोबतच गाडीतील चालक संतोष कुमार आणि रोहित खांडेवाल या दोघांचा ताबा ताब्यात घेण्यात आला आहे. परंतु आतापर्यंत पोलिस कोठडीत घेतलेली व्यक्ती कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही, उलट ते पुन्हा पुन्हा आपला जबाब बदलत आहेत.पोलिस या प्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेतदुसरीकडे, प्रचंड रक्कमेमुळे पोलिस सध्या सर्व नोटा मोजत आहेत. अशीही शक्यता आहे की, ही रक्कमही वाढू शकते. सध्या पोलीस सर्व बाबींचा शोध घेत आहेत. पोलिसांना काळा पैसा पहिल्यांदाच सापडला आहे. त्याचबरोबर हवाला कनेक्शन लक्षात घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशीही करीत आहे. स्कॉर्पिओचा चालक संतोष कुमार यांच्याशी बोलताना त्याने स्वत: चा बचाव करत सांगितले की, मी भाड्याची गाडी चालवतो आणि आजच जयनगर ते बेगूसरायकडे जाण्यासाठी निघालो. बर्याच ठिकाणी थांबलो आणि हे पैसे घेतले, परंतु त्याच्या कारमध्ये इतकी मोठी रक्कम आहे याबाबत आणि सोबत असलेल्या माणसाबद्दल माहिती नव्हती.निवडणुकीत पैशाचा वापर अपेक्षितरोहित म्हणाला, त्याच्या मालकाने जयनगरमध्ये कार बुक केली आणि आम्ही समस्तीपूरला निघालो आणि रोसडासहअनेक ठिकाणी गेलो, पण जेव्हा तो जयनगरहून बेगूसरायकडे जात होता तेव्हा विशनपुर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी रोहित खांडेवाल यांना गाडी थांबवण्याचे संकेत दिले.त्यावेळी रोहित खंडेवाल यांनी चालकाला गाडी पाळण्यास सांगितली. मात्र, चालकाने गाडी थांबवली आणि पोलिसांनी गाडीची तपासणी केली. तेव्हा गाडीत कोटी रुपयांची रक्कम आढळून आली. संपूर्ण जिल्ह्यात तपासणी मोहीम सुरू आहेदुसरीकडे दरभंगाचे एसएसपी बाबू राम यांनी सांगितले की, निवडणुका पाहता संपूर्ण जिल्ह्यात वाहन तपासणी मोहीम सुरू आहे. दरभंगाच्या विशनपूर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी स्कॉर्पिओचा शोध घेतला ज्यामध्ये सुमारे एक कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तथापि, पैसे अद्याप मोजले गेले नाहीत.एसएसपी स्पष्टपणे म्हणाले की, हा पैसा काळा पैसा असल्याचे दिसतेय, ते कोठून आणले आणि कोणाला द्यायचे होते हा तपासणीचा विषय आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती प्राप्तिकर विभागाकडून दरभंगा पोलिसांनाही दिली जाईल.जेणेकरून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊ शकेल. सध्या पोलिस पैसे मोजण्यात आणि संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात गुंतले आहेत.
Bihar Assembly Election 2020 : गाडीत सापडले कोटींचे घबाड, स्कॉर्पिओतील लोकांनी पोलिसांना दिला 'हा' जबाब
By पूनम अपराज | Published: October 07, 2020 9:14 PM
Bihar Assembly Election 2020 : आतापर्यंत पोलिस कोठडीत घेतलेली व्यक्ती कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाही, उलट ते पुन्हा पुन्हा आपला जबाब बदलत आहेत.
ठळक मुद्दे रोहित खंडेवाल यांनी चालकाला गाडी पाळण्यास सांगितली. मात्र, चालकाने गाडी थांबवली आणि पोलिसांनी गाडीची तपासणी केली. तेव्हा गाडीत कोटी रुपयांची रक्कम आढळून आली.