शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

विश्वासघात! पती म्हणाला, तुला माझ्या हाताने जेवण भरवतो, मग विष देऊन पत्नीला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2022 10:33 AM

युवकाने नववर्षाच्या सुरुवातीला पत्नीचा जीव घेतला आहे. जेवणातून विष देऊन युवकाने पत्नीची हत्या केली

पटना – हुंड्यांच्या लालसेपोटी एका युवकाने पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासला आहे. ही घटना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याठिकाणी २०१९ मध्ये लग्न झालेल्या युवकाने स्वत:च्या पत्नीला संपवलं आहे. युवकाने पत्नीचा विश्वास संपादन केला आणि पत्नीनेही डोळे झाकून पतीवर विश्वास ठेवला. त्याचीच किंमत पत्नीला जीव देऊन चुकवावी लागली आहे.

युवकाने नववर्षाच्या सुरुवातीला पत्नीचा जीव घेतला आहे. जेवणातून विष देऊन युवकाने पत्नीची हत्या केली. पतीने पत्नीशी केलेल्या विश्वासघातामुळे तिची हत्या झाली. मिळालेल्या माहितीनुसार, हरनौत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिचली बाजार परिसरात राहणाऱ्या लवनेशचं लग्न चांदणी नावाच्या मुलीशी झालं होतं. दोघांमध्ये सर्वकाही सुरळीत झालं होतं. मात्र अचानक लवनेशच्या कुटुंबाने चांदणीच्या कुटुंबावर लग्नाच्यावेळी दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास सांगितले.

लवनेशदेखील कुटुंबाच्या म्हणण्याप्रमाणे पत्नी चांदणीवर हुंड्याचे पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता. चांदणीच्या घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना पैसे देणं कठीण होतं. त्यांच्याकडे पैसे नसल्याने लवनेशच्या कुटुंबाची मागणी ते पूर्ण करु शकत नव्हते. त्यामुळे लवनेश खूप नाराज झाला. त्यानंतर पती लवनेशनं पत्नीचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला.

लवनेशला कळालं की सासरची मंडळी हुंड्यातील पैसे देण्यास असक्षम आहेत तेव्हा त्याने कुटुंबासोबत मिळून प्लॅन रचला. नवीन वर्षाच्या निमित्ताने पती लवनेशनं पत्नीशी गोड बोलत तिला स्वत:च्या हाताने जेवण भरवणार असल्याचं म्हटलं. पत्नीदेखील खुश झाली. त्यानंतर दोघांनी खोलीचा दरवाजा आतमधून बंद करत जेवण करण्यासाठी पलंगावर बसले. पती लवनेशने काहीतरी बहाणा बनवत पत्नीला खोलीबाहेर पाठवलं. त्यानंतर खिशातून एक पुडी काढत ती जेवणात मिसळली. पत्नी खोलीत आल्यानंतर लवनेशनं तिला जेवण भरवलं.

पत्नी चांदणीच्या भावाने सांगितल्यानुसार, अलीकडेच लवनेशच्या कुटुंबाने हुंड्याच्या पैशासाठी चांदणीला बेदम मारलं होतं. माझी सासरी हत्या होईल असं वारंवार बहीण सांगत होती. अखेर तेच घडलं त्यांनी माझ्या बहिणीला मारलं. घटनेनंतर पोलिसांनी चांदणीचा मृतदेह खासगी रुग्णालयात पोस्टमोर्टमसाठी पाठवला. पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये विष देऊन हत्या केल्याचं समोर आलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून चांदणीच्या सासरच्या मंडळींना ताब्यात घेतले आहे.

 

टॅग्स :Biharबिहार