(प्रातिनिधिक फोटो)
Bihar Crime News : बिहारमध्ये आरोग्य सुविधांबाबत फारच वाईट अवस्था आहेत. याचं उदाहरण बानगी खगडियामध्ये बघायला मिळालं. जिल्ह्यातील अलौली सामुदायीक आरोग्य केंद्रात कौटुंबिक नियोजन करण्यासाठी आलेल्या महिलांना बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन न देता त्यांचं जबरदस्ती ऑपरेशन करण्यात आलं. महिला ओरडत राहिल्या, पण त्यांचे हात-पाय पकडून त्यांचं ऑपरेशन करण्यात आलं.
महिलांचा आरोप आहे की, आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात, पाय आणि तोंड दाबून ऑपरेशन केलं. यादरम्यान त्या ओरडत राहिल्या. असं सांगण्यात आलं की, ग्लोबल डेव्हलपमेंट इनीटिवेट नावाच्या प्रायव्हेट एजन्सीने या महिलांचं ऑपरेशन केलं. याच महिन्यात जिल्ह्यातील परबत्ता प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच घटना समोर आली होती.
परबत्ता प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑपरेशन करण्याआधी तासंतास खाली फरशीवर झोपवण्यात आलं होतं. परबत्ता प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रायव्हेट कंपनीला ठेका मिळाला आहे. एकूण काय तर परबत्ता प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांसोबत खेळ केला जात आहे.
डॉक्टरांनुसार, अशा स्थितीत महिलांना इन्फेक्शन आणि वेदना होऊ शकतात. सिव्हिल सर्जन डॉक्टर अमरनाथ झा म्हणाले की, या घटनेची चौकशी केली जाईल आणि रिपोर्ट आल्यावर चौकशी केली जाईल.