बिहारची राजधानी पटणामध्ये जिम ट्रेनरवर गोळ्या झाडल्या प्रकरणी नवा खुलासा झाला आहे. चौकशी दरम्यान समोर आलं आहे की, खुशबू आणि जिम ट्रेनर विक्रम ११०० वेळा फोनवर बोलले होते. त्यांचं हे बोलणं यावर्षी जानेवारीपासून सुरू झालं होतं. या संभाषणाच्या आधारावर डॉक्टरची पत्नी आणि जिम ट्रेनर यांच्यातील नात्याबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहे.
पटणा पोलिसांनी जिम ट्रेनर विक्रमच्या हत्येच्या प्रयत्नात जनता दल यूनायटेडचे नेता डॉ. राजीव कुमार सिंह आणि त्याची पत्नी खुशबू हिला ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांना काही अटींवर सोडण्यात आलं. या प्रकरणात नाव समोर आल्यावर जेडीयूच्या डॉक्टर्स विंगचे प्रदेश उपाध्यक्ष राहिलेले डॉ. राजीव यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलंय. (हे पण वाचा : अघोरी पूजेसाठी चेन्नईतून अपहरण केलेल्या बालकाची सुटका,दोन अपहरणकर्ते जेरबंद, नागपूर रेल्वेस्थानकावर कारवाई )
पोलिसांच्या सूत्रांनुसार, प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे की विक्रम सिंहचा खात्मा करण्यासाठी शूटर्सला हायर करण्यात आलं होतं आणि या प्लॅन मागे कथितपणे डॉ. राजीव कुमार सिंह आणि त्याची पत्नी खुशबू हिचा हात आहे. चौकशी दरम्यान समोर आलं की, विक्रम आणि खुशबू यावर्षी जानेवारीपासून एकमेकांना ओळखत होते
पटणा पोलिसांनी सांगितलं की, त्यांच्या मोबाइल फोनमधील कॉल्स डिटेल्समुळे हा खुलासा झाला होता की, दोघेही जानेवारी महिन्यापासून ११०० वेळा एकमेकांसोबत बोलले. डॉ. राजीव कुमार सिंह जे एक फिजिओथेरपिस्ट आहेत आणि पाटण्यातील बोरिंग रोड भागात एक क्लीनिक चालवतात.
आरोप आहे की, डॉ. राजीव कुमार सिंह यांनी कथितपणे आपल्या पत्नीसोबत संबंध असण्यावरून एप्रिलमध्ये विक्रमला जीवे मारण्याची धकमी दिली होती. विक्रम सिंह याच्यावर अज्ञात व्यक्तींनी शनिवारी गोळी झाडली होती. शरीरात पाच गोळ्या लागल्यानंतर विक्रमने २.५ किलोमीटर अंतर पार केलं आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचला.
जिम ट्रेनरने शुद्धीवर आल्यावर पोलिसांना जबाब दिला. त्यात तो म्हणाला की, या घटनेमागे डॉक्टर राजीव कुमार सिंह आणि त्याची पत्नी खुशबू आहे. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर दोघांनाही शहर न सोडण्याच्या अटीवर सोडून देण्यात आलं.