विकृतीचा कळस! एकतर्फी प्रेमातून मुलीवर बलात्कार; ओरडू नये म्हणून तारेने तिचा गळा आवळला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 03:15 PM2021-07-05T15:15:13+5:302021-07-05T15:23:38+5:30
Crime News : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या आणि बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मुलगी ओरडू नये म्हणून तारेने तिचा गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या बिलासपूरमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. 30 जून रोजी मुलीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मुलीचा मृतदेह आढळून आल्यानंतर वेगाने या प्रकरणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरातील लोकांनी आरोपी सूरज कश्यप याचं अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. तो मुलीला आपल्या जाळ्यात ओढू पाहत होता. मात्र मुलीने त्याला नकार दिला. मुलीने विरोध केल्याने सूरज संतापला. याचाच बदला घेण्यासाठी त्याने आपला मित्र महेंद्र पासीसोबत मिळून मुलीवर बलात्कार करण्याचा प्लॅन आखला. 30 जून रोजी तो मुलीला भेटला आणि एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला.
संतापजनक! सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल; 4 जणांना अटक#crime#crimenews#Policehttps://t.co/SeuWvPTT5I
— Lokmat (@MiLOKMAT) July 3, 2021
मुलीवर आरोपीने बलात्कार केला. तिने आरडाओरडा करू नये म्हणून तारेने तिचा गळा आवळण्यात आला. यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी तिची हत्या केली. उमेश कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच देशात अशा प्रकारच्या अनेक भयंकर घटना वारंवार समोर येत आहेत.
पत्नीपासून दूर राहण्यासाठी पतीने लढवली अनोखी शक्कल पण झालं असं काही...#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#Crimehttps://t.co/pkosm8wSkI
— Lokmat (@MiLOKMAT) July 3, 2021
नात्याला काळीमा! वडील आणि भावाने तरुणीला झाडाला उलटं लटकवून बेशुद्ध होईपर्यंत केली बेदम मारहाण
एका तरुणीला तिचे वडील आणि भावाने मिळून झाडाला उलटं लटकलं आणि नंतर बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या अलीराजपूरमध्ये ही संतापजनक घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे. वडिलांनी आणि भावाने मिळून तिला झाडाला उलटं लटकवलं आणि बेदम मारहाण केली. तसेच जमिनीवर आपटून देखील तिला मारहाण करण्यात आली. ती बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात येत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
विमानतळावर अशी झाली पोलखोल; जाणून घ्या नेमकं काय आहे हे प्रकरण? #crime#crimesnews#DRUGShttps://t.co/6fXqadINV8
— Lokmat (@MiLOKMAT) July 5, 2021