मुंबई - वडाळा परिसरातील नालेसफाईच्या कामाची देखरेख करणाऱ्या भाजपा नगरसेविकेने बृहन्मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात लगावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. स्थानिक भाजपा नगरसेविका कृष्णवेनी रेड्डी असं नगरसेविकेचे नाव आहे. परंतु नगरसेविकेने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे वडाळा टी. टी. पोलिसांनी सांगितले. बृहन्मुंबई महापालिका अधिकारी कोठड आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर होते. एवढ्यात भाजपा नगरसेविका कृष्णवेनी यांनी कोठड यांच्याशी साफसफाईच्या कामावरून आधी वाद घातला आणि नंतर श्रीमुखात लगावली, असा आरोपी कोठड यांनी केला. तर विजय नगर रोड परिसरातील नालेसफाईचे काम उशीरा सुरू झाल्याने परिसरात पाणी तुंबत असल्याचे कृष्णवेनी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नालेसफाईच्या कामाबद्दल विचारणा केल्यावर हे काम दिवसभरात पूर्ण होईल अशी ग्वाही कृष्णवेनी यांनी दिल्याची माहितीही कोठड यांनी दिली. यासंदर्भात वडाळा टी. टी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रेड्डी यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३५३ आणि ३३२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भाजपा नगरसेविकेने पालिका अधिकाऱ्यांच्या श्रीमुखात लगावली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 10:10 PM
याचा अधिक तपास सुरु असल्याचे वडाळा टी. टी. पोलिसांनी सांगितले.
ठळक मुद्देबृहन्मुंबई महापालिका अधिकारी कोठड आपल्या सहकाऱ्यांसोबत कर्तव्यावर होते. महापालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार रेड्डी यांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३५३ आणि ३३२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला