मुंबईत सट्टा बाजारात भाजप फेव्हरेट; दक्षिण मुंबईच्या जागेवर काटे की टक्कर होणार

By पूनम अपराज | Published: May 11, 2019 07:59 PM2019-05-11T19:59:17+5:302019-05-11T20:01:01+5:30

लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक सट्टा २०१९ च्या निवडणुकांवर लागल्याची माहिती सट्टा खेळणाऱ्यांनी दिली आहे. 

BJP favored in Mumbai in Satta Bazar; Strong fight for South Mumbai spot | मुंबईत सट्टा बाजारात भाजप फेव्हरेट; दक्षिण मुंबईच्या जागेवर काटे की टक्कर होणार

मुंबईत सट्टा बाजारात भाजप फेव्हरेट; दक्षिण मुंबईच्या जागेवर काटे की टक्कर होणार

Next
ठळक मुद्देउत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टीवर सट्टेबाजारात  २७ पैशांचा सट्टा लावण्यात आला आहे. काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर ३ रुपये भाव लावण्यात आला आहे.अरविंद सावंत ५४ पैसे, मिलिंद देवरा ५२ पैसे भाव लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकीचे मतदान झाल्यानंतर मुंबईच्या सहा जागांवर सट्टा बाजारात भाजपच फेव्हरिट असल्याचे दिसून येत असले, तरी देखील सहा पैकी एका जागेवर काँग्रेस उमेदवाराकडून काटे की टक्कर दिली जाऊ शकते, असा अंदाज सट्टा बाजारात वर्तवण्यात येत आहे. मुंबईत महायुतीला ६ पैकी ५ जागांवर यश मिळणार असल्याची चर्चा सट्टाबाजारात आहे. दक्षिण मुंबईच्या जागेवर काटे की टक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक सट्टा २०१९ च्या निवडणुकांवर लागल्याची माहिती सट्टा खेळणाऱ्यांनी दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीतही सट्टा बाजार तेजीत असून भाजपसह विविध पक्षांवर कोट्यवधींची रक्कम लावण्यात आली आहे. सद्यस्थितीत सट्टा बाजारात भाजपला पसंती मिळत असली, तरी मतदानाच्या टप्प्यांगणिक त्यांच्या जागा या फारच कमी मतांनी निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर भाजपला मुंबईक ६ पैकी ५ जागांवर विजय मिळेल, तर दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांना मिलिंद देवरा यांच्यात तगडी लढत होणार असून दोघांपैकी कुणीही काही हजार मतांच्याच फरकाने निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच सट्टा बाजारात जिंकणाऱ्या पक्षावर एका हजार रुपयामागे ५०० रुपये नफा मिळतो. तर पराभूत पक्षावर १००० रुपये लावल्यास २००० नफा मिळणार. या कमी पैसे गुतवणाऱ्यांची जागा ही निश्चित मानली जाते. त्यानुसार उत्तर मुंबईतील उमेदवार गोपाळ शेट्टीवर सट्टेबाजारात  २७ पैशांचा सट्टा लावण्यात आला आहे. तर त्याच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर ३ रुपये भाव लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गजानन किर्तीकर ६५ पैसे, संजय निरुपम १ रुपया १० पैसे, राहुल शेवाळे ४५ पैसे, एकनाथ गायकवाड १ रुपये ६० पैसे, संजय दिना पाटील १ रुपये १७ पैसे, मनोज कोटक ७० पैसे, पूनम महाजन ५५ पैसे, प्रिया दत्त १ रुपया, अरविंद सावंत ५४ पैसे, मिलिंद देवरा ५२ पैसे भाव लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

राजकीय वातावरणाचा सर्वात अचूक अंदाज सट्टेबाजांना लागतो. मतदार ज्या पक्षाच्या बाजूने बोलतात तसे सट्टा लावणारे देखील भाव बदलतात. दीड वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भाजपची सत्ता येईल, हा सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांतही याचा प्रत्यय आला होता. राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येईल, हे त्यावेळी सट्टेबाजांनी सांगितले होते. मात्र, छत्तीसगडमध्ये भाजप फार कमी अंतराने विजयी होईल, हा सट्टेबाजांचा अंदाज चुकीचा ठरला होता. तूर्तास तरी सट्टेबाजांचे मत आपल्या बाजूने असल्यामुळे भाजपचं पारडं सध्यातरी जड आहे. 

Web Title: BJP favored in Mumbai in Satta Bazar; Strong fight for South Mumbai spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.