शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
4
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
5
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
6
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
7
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
8
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
9
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
10
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
11
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
12
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
13
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
14
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
15
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
16
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
17
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
18
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
19
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
20
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 8:05 PM

हिट अँड रन प्रकरणात बीएमडब्ल्यू चालवणारा अजमतुल्लाहचे वडील हमीदुल्लाह यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

हिट अँड रन प्रकरणात बीएमडब्ल्यू चालवणारा अजमतुल्लाहचे वडील हमीदुल्लाह यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. या अपघातातील आरोपी हनी उर्फ ​​अजमतुल्लाह खान याचा पोलीस शोध घेत आहेत, घटनेनंतर तो फरार आहे. या संदर्भात आता पोलिसांनी आरोपीचे वडील आणि भाजपा नेते बब्बू खान म्हणजेच ​​हमीदुल्लाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

मृत्यू झालेल्या रामलालच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, अपघाताच्या वेळी हमीदुल्लाह हे आरोपी हनीसोबत बीएमडब्ल्यू कारमध्ये होते. रामलालच्या मृत्यूनंतर दोघेही घरातून पळून गेले, या प्रकरणी रामलालची पत्नी ज्ञानवती यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ७२ तासांनंतरही आरोपी हनीला अटक झालेली नाही.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

श्रीमंत कुटुंबातील एका मुलाने बीएमडब्ल्यू चालवत पायी जाणाऱ्या माणसाला जोरदार धडक दिली, त्यामध्ये रामलाल नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पण शवविच्छेदनानंतर कुटुंबीय मृतदेह घेऊन रस्त्यावरच बसले. 

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कुटुंबीयांना खूप समजावून सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. बीएमडब्ल्यू चालवणाऱ्या तरुणाचं नाव हनी असून तो भाजप नेत्याचा मुलगा आहे. या घटनेनंतर दोघे पिता-पुत्र फरार होते. पण आता भाजपा नेत्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी