भाजप नेत्याची राहत्या घरात हत्या; PFI च्या 14 सदस्यांसह एकूण 15 जणांना फाशीची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 04:09 PM2024-01-30T16:09:52+5:302024-01-30T16:11:21+5:30
भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव रंजीत श्रीनिवासन यांची राहत्या घरात कुटुंबासमोर हत्या करण्यात आली होती.
Kerala Court: भाजपचे केरळमधील ओबीसी नेते रंजीत श्रीनिवासन यांची दोन वर्षांपूर्वी त्यांच्या राहत्या घरात हत्या झाली होती. याप्रकरणी आज केरळ उच्च न्यायालयाने प्रतिबंधित पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या 14 सदस्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, पीएफआयवर संपूर्ण देशात बंदी घालण्यात आलेली आहे.
या 14 दोषींव्यतिरिक्त उच्च न्यायालयाने सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच SDPIशी संबंधित एका कार्यकर्त्यालाही फाशीची शिक्षा सुनावली आहे. अशाप्रकारे श्रीनिवासन यांच्या हत्येप्रकरणी एकूण 15 जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. केरळच्या अलप्पुझा एडीजे कोर्टातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश श्रीदेवी यांनी हा निर्णय सुनावला आहे.
STORY | 14 PFI workers get death sentence in killing of BJP leader in Kerala
— Press Trust of India (@PTI_News) January 30, 2024
READ: https://t.co/UzIXJd81Dd
VIDEO: pic.twitter.com/PDwVg9423g
काय आहे संपूर्ण प्रकरण?
19 डिसेंबर 2021 रोजी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव श्रीनिवासन यांची हत्या झाली होती. पीएफआय आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया शी संबंधित कार्यकर्त्यांनी श्रीनिवासन यांच्यावर त्यांच्या घरावर त्यांच्या कुटुंबासमोर हल्ला करून त्यांची हत्या केली होती. एसडीपीआयचे नेते केएस शान यांच्या हत्येनंतर श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. केएस शान यांची हत्या 18 डिसेंबर रोजी टोळीने केली होती. या हत्येनंतर काही तासांतच श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली.
PFI, SDPI म्हणजे काय?
PFI म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, ही एक इस्लामिक राजकीय संघटना आहे. अल्पसंख्याकांच्या अतिरेकी कारवायांमुळे PFI वर सप्टेंबर 2022 मध्ये पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने या संघटनेवर UAPA अंतर्गत बंदी घातली आहे. SDPI म्हणजेच सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना जून 2009 मध्ये झाली.