भाजप आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 04:03 PM2022-01-03T16:03:31+5:302022-01-03T16:08:17+5:30
Nitesh Rane : सिंधुदूर्ग सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.
भाजप आमदार नितेश राणेंनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. मंगळवारी म्हणजेच उद्या मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यात येणार आहे. सिंधुदूर्ग सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे.
शिवसेनेचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू आहे, गुरुवारी याबाबत अंतिम निकाल येणे अपेक्षित होता त्याप्रमाणे अंतिम निकाल आला. त्यावेळी न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत दणका दिला होता.
महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता परिसरात करण्यात आला होता याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती यातील मुख्य सूत्रधार हा सचिन सातपुते असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या वरूनच पोलिसांकडून आमदार नितेश राणे याच्या अटकेची तयारी केली होती तत्पूर्वी त्याची नोटीस देऊन चौकशी ही करण्यात आली होती.