नवी दिल्ली : भाजपचा निलंबित आमदार कुलदीपसिंह सेंगर याला उन्नाव बलात्कार प्रकरणात सोमवारी दिल्लीतील सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. एका अल्पवयीन मुलीचे २०१७ मध्ये अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा सेंगरवर आरोप होता. मंगळवारी सेंगर याला शिक्षा सुनावण्यासाठी सुनावणी होईल.
या घटनेतील एक आरोपी शशी सिंह हिला मात्र न्यायालयाने दोषमुक्त ठरविले. सेंगरवर अपहरण, बलात्कार गुन्हा सिद्ध झाला आहे. पोक्सोंतर्गत जास्तीत जास्त जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे. उत्तर प्रदेशातील बागरमऊ मतदारसंघातून चौथ्यांना निवडून आलेल्या सेंगरला बलात्कारानंतर भाजपने पक्षातून निलंबित केले होते.सेंगरवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीला २८ जुलैला ट्रकने धडक दिली होती. त्यात ती गंभीर जखमी झाली, पण कुटुंबातील एका सदस्याला प्राण गमवावे लागले.
सेंगर ढसाढसा रडलान्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर कुलदीप सेंगर कोर्ट रूममध्येच ढसाढसा रडला. बहिणीच्या मागे उभा राहून रडत असताना त्याला सावरायला त्याच्या कुटुंबातील कुणी पुढे आले नाही, असे कळते.