भाजपाचा अल्पसंख्याग विभागाचा अध्यक्ष तडीपार; राष्ट्रवादीचा नेत्यालाही मनाई आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 03:54 PM2019-04-25T15:54:05+5:302019-04-25T15:56:28+5:30
बविआ नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित पेंढारी याच्यावर तुळींज, वालीव पोलीस ठाण्यात 5 ते 6 गंभीर गुन्हे दाखल
नालासोपारा - सोमवारी उशिरा प्रांतानी तडीपार आणि मनाई आदेश काढलेल्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे वसई विरार अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद अन्सारी याच्यासह सात जणांना पालघर जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार कऱण्यात आले आहे. तसेच खंडणी प्रकऱणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता व माजी जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर, बविआच्या नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित पेंढारी याच्यासह २६ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
नालासोपारा शहरातील नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात 10 ते 12 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने भाजपाचा वसई विरार अल्पससंख्याक विभागाचा अध्यक्ष जावेद अन्सारी याला तडीपार करण्यात आल्याचे व बविआ नगरसेविका जया पेंढारी यांचा मुलगा अमित पेंढारी याच्यावर तुळींज, वालीव पोलीस ठाण्यात 5 ते 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याने निवडणुकीच्या काळात मतदानाच्या दिवसाअगोदर 14 दिवस आणि मतमोजणीच्या तीन दिवशी मनाई आदेश प्रांतानी काढला असल्याचे तुळींज वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले. तर वसईतील बहुचर्चित खंडणी प्रकरणातील आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी वसई विरार जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर याच्यासह २६ जणांवर मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.