लग्नाच्या बहाण्यानं BJP युवा नेत्यानं आधी बलात्कार केला मग गर्भपात; पक्षानं केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 20:39 IST2022-06-13T20:31:13+5:302022-06-13T20:39:10+5:30
Rape Case on BJYM leader : मुलीने सेंगर विरुद्ध भैरवगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे.

लग्नाच्या बहाण्यानं BJP युवा नेत्यानं आधी बलात्कार केला मग गर्भपात; पक्षानं केली हकालपट्टी
उज्जैन : देवास येथील भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता कुणाल सेंगरवर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. लग्नाच्या बहाण्याने आरोपीने मुलीवर बलात्कार केला. मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिचा खासगी रुग्णालयात गर्भपातही करून घेतला. मुलीने सेंगर विरुद्ध भैरवगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्याचबरोबर प्रतिमा डागाळलेले नेते कुणाल सेंगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवास जिल्ह्यातील सोनकछ येथे राहणारा भारतीय जनता युवा मोर्चाचा हकालपट्टी केलेला नेता कुणाल सेंगरवर बलात्काराचा आरोप आहे. २४ वर्षीय पीडितेने सांगितले की, त्यांची मैत्री दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यावर कुणालने लग्नाच्या बहाण्याने मुलीवर बलात्कार केला. मुलीने लग्नासाठी दबाव टाकला असता आरोपीने तिला केडी पॅलेसजवळील फार्म हाऊसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडित मुलगी गर्भवती असल्याची माहिती मिळताच तिला खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात करण्यात आला.
दोन महिलांनी एकमेकांच्या पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा केला दाखल
या घटनेनंतर कुणालने त्याच्या मित्रासह पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या जबाबावरून कुणालविरुद्ध उज्जैनमधील भैरवगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार आहे.
भैरवगड पोलिस स्टेशनचे टीआय प्रवीण पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल, असा दावा केला जात आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुणाल सेंगर यांची पक्षाने युवा मोर्चाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे.