नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. अनेकदा प्रेम प्रकरणात अपयश आल्यास टोकाचा निर्णय घेतला जातो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. प्रेमाने घात केला म्हणून भाजपाच्या युवा नेत्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. नेत्याजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमधून प्रेमप्रकरणात अपयश आल्यामुळेच त्याने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील (Chattisgarh) दुर्ग (Durg) शहरात राहणारा गोपाळ सिंह राजपूत हा भारतीय जनता युवा मोर्चाचा नेता होता.
गोपाळ सिंह याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली. ज्यामध्ये प्रेमात धोका मिळाल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळने सर्वात आधी हाताची नस कापली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी गोपाळने आपल्या कुटुंबीयांसोबत रात्री एकत्र जेवण घेतलं. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यानंतर रात्री तो आपल्या खोलीत झोपायला निघून गेला.
सकाळी बराच वेळ तो दार उघडत नसल्यामुळे त्याच्या भावाने दरवाजा तोडला. त्यावेळी गोपाळने गळफास घेतला होता. गळफास घेण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हाताची नसदेखील कापली होती. हे पाहून कुटुंबीयांना मोठा धक्काच बसला. गोपाळच्या पाकिटात त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली. आपल्याला प्रेमात आलेलं अपयश सहन होत नसल्यामुळेच आपण आत्महत्या कऱण्याचा निर्णय घेत आहोत असं त्याने या नोटमध्ये लिहिलं आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा दिली; पेटत्या निखाऱ्यांवरून सून चालली; Video व्हायरल
सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ती चक्क पेटत्या निखाऱ्यांवरून चालली आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील सौसर परिसरात ही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सासू आणि सुनेचं पटत नव्हतं. त्यांच्यामध्ये छोटे मोठे वाद हे नेहमीच होत होते. आपल्या मुलाला काहीतरी खायला घालून सुनेने वश केलं आहे, असा आरोप सासूने केला. यावरून ती सुनेला सतत टोमणे मारायची. दररोजच्या या कटकटीला सून इतकी वैतागली की अखेर यातून मुक्ती मिळवण्यासाठी ती भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकली.