Video : मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावण्याचा डाव फसला; दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 07:25 PM2018-11-05T19:25:57+5:302018-11-05T19:26:35+5:30
कंपनीत काम करणारे मंगलेश भारती, सरस्वतीप्रसाद मिश्र, सरोजकुमार पांडा, रमेश चांदलकर हे कंपनीतून बाहेर पडत असताना कंपनीच्या आगीच्या विळख्यात सापडले. त्यात हे चौघेही जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मुंबई - दिवाळी सणानिमित्त मंत्रालयाबाहेर काळा कंदील लावून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून भाजप सरकारचा निषेध करण्याचा प्रयत्न आज फसला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी राजगुरू चौक येथून काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ठाण्याचे विलास गंगावणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. हे दोघेही नागपाडा येथे राहणारे असून झिशान सय्यद अहमद असे एकाचे नाव आहे. काँग्रेस (आय) पक्षाचा हा पदाधिकारी आहे.
मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंत्रालयासमोर काळा कंदील लावून निषेध करण्यापूर्वीच दोघांना ताब्यात घेतले आणि मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेला होणारी बाधा टळली आहे.