पुणे : शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना काळ्या बाजारात चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी खासगी रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रातील परिचारिकेसह दोघांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) ही कारवाई करण्यात आली.पृथ्वीराज संदीप मुळीक (२२) आणि नीलिमा किसन घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेकर खासगी रुग्णालयात परिचारिकेचे काम करतात. एफडीएतील निरीक्षक अतिश सरकाळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
नातेवाईक रस्त्यावरअहमदनगर : रेमडेसिविर इंजेक्शन शोधूनही मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक केडगावमध्ये थेट रस्त्यावर उतरले. पोलिसांनी मध्यस्थी केली तरीही रुग्णांना इंजेक्शन मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी नगर-पुणे महामार्गावरच ठिय्या मांडत संताप व्यक्त केला.