नवी दिल्ली : नाशिकमधील रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित व्यक्तींकडे प्राप्तिकर खात्याला १०० कोटींची बेहिशेबी संपत्ती आढळली आहे. ही कांदा व्यापाऱ्यांकडील काळा माया जमीन खरेदीसाठी वापरण्यात आली, असे उघड झाले आहे.प्राप्तिकर खात्याने नाशिक जिल्ह्यातील २१ ऑक्टोबरला काही कांदा व्यापाऱ्यांवर छापे मारले होते. अनेक कांदा व्यापाऱ्यांनी बेहिशेबी पैसा जमीन खरेदीसाठी वापरल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सोमवारी दिली. ज्यांच्यावर छापे मारले, त्यापैकी बहुतांशजण पिंपळगाव बसवंत भागातील आहेत. कारवाईत २३ कोटी ४५ लाख रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.
२६ व्यापारी रडारवरनाशिक : २६ व्यापारी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आहेत. कांदा दर नियंत्रणात राहण्यासाठी धाडी घातल्याचे सांगण्यात येत होते. पिंपळगावच्या एका भूखंड खरेदीतच कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे आणि त्यात कांदे व द्राक्ष व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याचे समजते.